स्वत:ला ओळखणे म्हणजे ‘प्रदत्त’ उर्जाच - डॉ. बाबामहाराज तराणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:05 PM2019-06-30T12:05:37+5:302019-06-30T12:05:50+5:30

चुडामण बोरसे देवाची संकल्पना म्हणजे माणसाच्या शरीरात असणारे तेज होय. प्राणवायू आणि अग्नि हे दोन्ही मिळून जे निर्माण होतं ...

Knowing yourself is 'paid' energy | स्वत:ला ओळखणे म्हणजे ‘प्रदत्त’ उर्जाच - डॉ. बाबामहाराज तराणेकर

स्वत:ला ओळखणे म्हणजे ‘प्रदत्त’ उर्जाच - डॉ. बाबामहाराज तराणेकर

Next

चुडामण बोरसे
देवाची संकल्पना म्हणजे माणसाच्या शरीरात असणारे तेज होय. प्राणवायू आणि अग्नि हे दोन्ही मिळून जे निर्माण होतं ते दत्त. यातून स्वत:ला ओळखणे म्हणजे ‘प्रदत्त’ उर्जा होय, असे प्रतिपादन त्रिपदी परिवाराचे प्रमुख डॉ. बाबामहाराज उर्फ प्रदीप तराणेकर यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. त्रिपदी परिवारातर्फे आयोजित गणेश याग कार्यक्रमासाठी डॉ. तराणेकर हे जळगावात आले होते. त्यावेळी परिवार आणि त्यांच्या कार्याविषयी त्यांच्याशी झालेली ही प्रश्नोत्तरे...
प्रश्न- परमार्थ भक्ती असावा की विचारांचा
डॉ. तराणेकर - परमार्थाचे दोन अर्थ आहेत. स्व: चा छोटा अर्थ स्वार्थ आणि मोठा अर्थ परमार्थ. भक्ती, कर्म आणि ज्ञानमार्ग हे माणसाला माणूसपणाकडे घेऊन जाणारे मार्ग आहेत.
प्रश्न- अध्यात्माची व्याख्या काय सांगाल...
डॉ. तराणेकर - अध्यात्माची परिभाषा सरळ तेवढीच सोपी आहे. अध्यात्म म्हणजे मन आणि त्यानंतर आत्मा. या दोघांवर नियंत्रण करते ते अध्यात्म होय. आणि म्हणूनच चले चित्त चले प्राण असे म्हटले जाते. प्राणवायू आणि अग्नि हे दोन्ही मिळून जे तेज उत्पन्न होते. ते तेज म्हणजे प्रदत्त उर्जा होय.
प्रश्न - त्रिपदी परिवारातर्फे अध्यात्मातून समाजप्रबोधन सुरु आहे. त्याला मग आधुनिकतेची जोड कशी दिली गेली?
डॉ. तराणेकर - मूळात मी स्वत:च शास्त्रज्ञ आहे. त्यामुळे आमचा परिवार विज्ञाननिष्ठतेवर उभा आहे आणि राहिल. आता राहिले नाम. दत्त नाम आणि गायत्री मंत्रात एवढी शक्ती आहे की तुमच्याच नक्की बदल होतो. अर्थात हे सगळे अनुभवण्याची प्रक्रिया आहे. त्रिपदी परिवाराच्या देश आणि विदेशात मिळून ३५० शाखा आहेत. वृक्षसंवर्धनासाठी चैतन्यवाडी उपक्रम राबविला जात आहे.
अध्यात्मापासून आणि विज्ञानापर्यत असा चौफेर फेरफटका मारणारे डॉ. बाबामहाराज तराणेकर हे बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी आहेत. ते स्वत: भूगर्भशास्त्रज्ञ आहेत. जमीनीत कुठल्या भागात पाणी लागू शकते हे ते सांगू शकतात. इंदूर महापालिकेला त्यांनी पाणी लागू शकतील, अशा किमान दोन हजार सार्इंटस् दाखविल्या आहेत. त्यापैकी ९८ टक्के साईट यशस्वी झाल्या असल्याचा त्यांचा दावा आहे.
ग्रंथालयात ३५०० पुस्तके
विशेष म्हणजे बाबा महाराज तराणेकर हे पूर्वी भूजल सर्वेक्षण विभागात अभियंता होते. त्यांच्या नोकरीची सुरुवात ही जळगावातून झाली आहे. इंदूर येथे त्रिपदी परिवाराचे प्रमुख कार्यालय आहे. तिथे डॉ.तराणेकर यांचे स्वत: ३५०० हजार पुस्तके असलेले ग्रंथालय असल्याची माहिती त्यांनी दिली.
आताशा तरुण पिढीचाही अध्यात्माकडे कल वाढ आहे. बंगलोर येथे गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही गणेश याग केला होता. यात किमान ३०० उच्च शिक्षित विद्यार्थी सहभागी झाले होते. ही एक समाधानाची बाब आहे.-डॉ. बाबामहाराज तराणेकर

Web Title: Knowing yourself is 'paid' energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव