सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषकाचे अंतिम विजेतेपद कोल्हापूरने पटकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2023 07:16 PM2023-08-20T19:16:10+5:302023-08-20T19:16:21+5:30

नागपूर उपविजेता, पुणे विभाग तृतीय क्रमांक, उत्कृष्ट खेळाडू विकास, अनिमेष, तनवीर

Kolhapur won the final title of Subroto Mukherjee Football Cup | सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषकाचे अंतिम विजेतेपद कोल्हापूरने पटकावले

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषकाचे अंतिम विजेतेपद कोल्हापूरने पटकावले

googlenewsNext

भूषण श्रीखंडे

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल जळगाव येथे १७ वर्षांतील मुलांच्या राज्यस्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेचा समारोप रविवारी झाला. स्पर्धेचा अंतिम सामना कोल्हापूर विरुद्ध नागपूर यांच्यात खेळला गेला. कोल्हापूर विभागाने नागपूरचा ५-० ने असा दणदणीत पराभव करीत अंतिम विजेतेपद पटकाविले. तृतीय स्थानासाठी नाशिक विरुद्ध पुणे यांच्यात झालेला सामना पुणे संघाने १-० ने जिंकला.

राज्यस्तरीय शालेय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला कोल्हापूरचे सौरभ भोसले, गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. केतकी पाटील, ज्ञानदेव महाडिक, जफर शेख, प्रदीप तळवलकर, जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव फारूक शेख, कार्याध्यक्ष अनिता कोल्हे, सहसचिव अब्दुल मोहसीन, संचालक ताहेर शेख, आमिर शेख, मनोज सुरवाडे, भास्कर पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन फारुक शेख यांनी केले. आभार जिल्हा क्रीडा अधिकारी गुरुदत्त चव्हाण यांनी केले.

विजेत्यांना चषक, पदक देऊन गौरव
या फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूचा मान नागपूरचा गोलकीपर अनिमेश सोरेन, सर्वाेकृष्ट खेळाडू म्हणून कोल्हापूरचा तनवीर अहमद याला गौरविण्यात आले. अंतिम स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून नागपूरचा विकास निगथोजन यांना पारितोषिक देण्यात आले. विजय, उपविजय संघांना चषक व तसेच स्पर्धेतील प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूंना पदक व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Kolhapur won the final title of Subroto Mukherjee Football Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.