साहित्य अभिवाचनात कोल्हापूरचे ‘धाकटे आकाश’ प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 12:03 AM2019-02-25T00:03:37+5:302019-02-25T00:06:38+5:30
रंगगंध कलासक्त न्यास आयोजित अखिल भारतीय साहित्य अभिवाचन महोत्सवात कोल्हापूरच्या सर्जन शाळा संघाच्या ‘धाकटे आकाश’ने पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली. द्वितीय पुणे, तर नाशिकला तृतीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक दिग्दर्शन व अभिनयाची पारितोषिकेही देण्यात आली.
चाळीसगाव, जि.जळगाव : रंगगंध कलासक्त न्यास आयोजित अखिल भारतीय साहित्य अभिवाचन महोत्सवात कोल्हापूरच्या सर्जन शाळा संघाच्या ‘धाकटे आकाश’ने पहिल्या क्रमांकावर मोहोर कोरली. द्वितीय पुणे, तर नाशिकला तृतीय क्रमांक मिळाला. वैयक्तिक दिग्दर्शन व अभिनयाची पारितोषिकेही देण्यात आली. रविवारी सायंकाळी महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात बक्षीस वितरण झाले.
गेल्या १६ वर्षांपासून रंगगंधतर्फे अ.भा.स्तरावर मराठी साहित्य अभिवाचन महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदाचे हे १७ वे वर्ष असून एकूण २८ संघांनी सहभाग नोंदवला. राज्यातील २१ केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडली. शुक्रवारी अभिवाचन महोत्सवाचे उद्घाटन आमदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते झाले.
रविवारी सायंकाळी मुंबई येथील ज्येष्ठ रंगकर्मी गिरीष पतके यांच्या हस्ते विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून बेलगंगा साखर कारखान्याचे चेअरमन चित्रसेन पाटील, प्रमोद लिमये, नरेंद्र आमले, मीनाक्षी निकम, अश्विनी पाटील, प्रकाश कुलकर्णी, विश्वास देशपांडे, उमाकांत ठाकुर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रंगगंधचे अध्यक्ष डॉ.मुकुंद करंबेळकर यांनी केले. सूत्रसंचालन योगेश पाटील यांनी केले.
अभिवाचन विजेते असे :
प्रथम सर्जन शाळा, धाकटे आकाश (कोल्हापूर), द्वितीय महाराष्ट्र कल्चरल सेंटर, आपली कथा आपणच लिहावी (पुणे), तृतीय अक्षरायन, भगव्या वाटा (नाशिक), उत्तेजनार्थ प्रथम विजीगीषा फाऊंडेशन, अमिबा आणि स्टील ग्लास (मुंबई), उत्तेजनार्थ द्वितीय चक्री, पाच तीन दोन मनोरंजन (मुंबई)
वैयक्तिक दिग्दर्शन विजेते : शंतनू पाटील- धाकटे आकाश (प्रथम), द्वितीय- प्रमोद काळे आपली कथा आपणच लिहावी (द्वितीय), अर्पणा क्षेमकल्याणी - भगव्या वाटा (तृतीय)
वैयक्तिक अभिनय विजेते : शंतनू पाटील- प्रथम, वेदांत रानडे- द्वितीय, पल्लवी पटर्वधन- तृतीय, शिवराम धनवडे- उत्तेजनार्थ प्रथम, सुचित्रा पंडित - उत्तेजनार्थ दुसरे, प्रीतेश मांजलकर- उत्तेजनार्थ तिसरे, मोहन गोगारे - उत्तेजनार्थ चौथे, विवेक कविश्वर- उत्तेजनार्थ पाचवे. सर्वोत्कृष्ट संहिता लेखन पाच तीन दोन मनोरंजन, समीक्षक गटात सामंत विद्यालय (चाळीसगाव) तर सर्वोत्कृष्ट बृहन्महाराष्ट्र पारितोषिक उज्जेनच्या स्वर संवाद संस्थेने पटकावले.