कोरानामुक्ती; ग्रामीण भागात सुक्ष्म नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2020 12:48 PM2020-05-11T12:48:48+5:302020-05-11T12:49:01+5:30
बी़ एऩ पाटील : कंटेन्मेंट झोनसाठी निरीक्षक
जळगाव : प्रत्येक तालुक्यावर समन्वयकांची शिवाय ग्रामीण भागातील प्रत्येक कंटेन्मेंट झोनसाठी निरीक्षक व प्रमुखांची नेमणूक तत्काळ करण्यात येणार असून कोरोनामुक्तीसाठी सुक्ष्मनियोजन केले जात असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सीईओ तथा नियंत्रक अधिकारी डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी दिली़ सध्या लोकांनी स्वत:ची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचा संदशेही त्यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत दिला आहे़
प्रश्न : नवीन जबाबदारीचे स्वरूप कसे व काय उपाययोजना असतील?
ेडॉ़ पाटील : रविवारी सर्व क्वारंटाईन कक्ष, पायाभूत सुविधा कशा आहेत याचा आढावा घेतला आहे़ डॉक्टरांचा प्रेसेंस वाढवायचा असून त्यासाठी सोमवारपासून प्रत्येक तालुक्याला समन्वयकांची नेमणूक केली जाणार आहे़ कंन्टेटमेंटझोनमध्येही निरीक्षक व प्रमुख नियुक्त असतील़ यासाठी रुग्णालयांमध्ये अडचणी येणार नाही, यासाठी माहिती घेण्यासाठी नियंत्रणासाठी समन्वक नेमणार आहोत़ त्यांनी हॉस्पीटल तपासून किती बेड आहेत, काय सुविधा आहेत याची माहिती घ्यायची आहे़
प्रश्न : ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे काय उपाययोजना राबविणार ?
डॉ़ पाटील : प्रत्येक तालुकानिहाय सुक्ष्मनियोजन करण्यात येणार आहे़ सर्व स्थलांतरीचांची माहिती घेऊन त्यांच्या तपासण्या शिवाय क्वारंटाईन कक्षामध्ये लक्षणे किंवा लक्षणे नसलेल्या रूग्णांना आणून त्यांच्यावर निरीक्षण ठेवले जाईल, ग्रामीण भागासाठीही निरीक्षक असतील़
प्रश्न : मृत्यूदर वाढला आहे, आरोग्य सुविधा अधिक बळकट हवी का ?
ेडॉ़ पाटील : मृत्यूदर वाढला आता असे म्हणता येणार आहे़ आता जवळपास १८ टक्क्यांवर मृत्यू दर आहे़ आरोग्य सेवेसाठी जेथे डॉक्टर कमी आहेत त्या ठिकाणी खासगी, प्रशिक्षीत डॉक्टरांची सेवा घेणे, स्टॉफला पर्याय शोधणे, कोविड योद्धा नियुक्त करणे ही प्रक्रिया सुरू आहे़ या सर्वांचेही सुक्ष्मनियोजन करून उपाययोजना करण्यात येत आहेत़
शासन, प्रशासन, मीडिया जनतेला जागृत करण्याचे काम करीतच आहे़ हे सर्व जनतेसाठीच व जनतेच्या आरोग्यासाठीच आहे़ लोकांनी नियम पाळले, एकमेकांच्या संपर्क टाळला, काही असल्यास कळविले व प्रत्येकाने स्वत:हाची काळजी घेऊन कोविड योद्ध्यासारखे काम केल्यास ही कारोनाची साखळी आपण तोडू शकतो
- डॉ़ बी़ एऩ पाटील, सीईओ