मळगाव विविध विकास कामांपासून कोसोदूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:12 AM2021-06-05T04:12:33+5:302021-06-05T04:12:33+5:30
गावाला पाणीटंचाई कायमची असल्याने नवीन जलजीवन पाणीपुरवठा योजना गिरणा नदीपासून पाईप लाईन टाकून जलकुंभासह तत्काळ मंजूर करावी. गाव अंतर्गत ...
गावाला पाणीटंचाई कायमची असल्याने नवीन जलजीवन पाणीपुरवठा योजना गिरणा नदीपासून पाईप लाईन टाकून जलकुंभासह तत्काळ मंजूर करावी. गाव अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरणाचे काम मंजूर करावे. मळगाव ते वाडे रस्ता, मळगाव ते तांदुळवाडी रस्ता, मळगाव ते बांबरुड प्र. ब. रस्ता डांबरीकरणाचा मंजूर करावा. भडगाव व चाळीसगाव आगारातून मळगाव बस फेऱ्या तत्काळ सुरू कराव्यात, शेत पाणंद रस्ते मंजूर करावे, गावात स्मशानभूमी अंतर्गत सुशोभिकरण, व समाज मंदिर सुशोभिकरणाचे काम मंजूर करावे, गिरणा जामदा उजवा कालव्यावरून नवीन पाटचारी मंजूर करून मळगाव शिवारातील तीनही पाझर तलावात पाणी सोडण्याचे नियोजन करावे, आमदारांनी मळगाव हे विकासासाठी दत्तक घ्यावे. मळगाव परिसरातील विविध विकास कामे मंजूर करून परिसराचा सर्वांगीण विकास करावा, अशी मागणी मळगाव सरपंच गुलाब जगन्नाथ पाटील, उपसरपंच निर्मला शैलेश मोरे , ग्रामपंचायत सदस्या उषाताई प्रताप परदेशी, शोभाबाई रामकृष्ण पाटील, कल्पना भीमराव चित्ते, रामकृष्ण श्यामराव मरसाळे आदी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, माजी ग्रामपंचायत पदाधिकारी, मळगाव तांदुळवाडी वि.का. सोसायटीचे पदाधिकाऱ्यांसह नागरिकातून होत आहे.
फोटो- ०५सीडीजे५