कोतवालांना चतुर्थश्रेणीचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:17 AM2021-07-29T04:17:49+5:302021-07-29T04:17:49+5:30
पाळधी : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन पाळधी, ता. धरणगाव : कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचारी हा दर्जा मिळवून देण्यात ...
पाळधी : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आश्वासन
पाळधी, ता. धरणगाव : कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचारी हा दर्जा मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे.
राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने पालकमंत्री पाटील यांना राज्यातील कोतवाल संवर्गातील विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, कोतवालांना चतुर्थश्रेणी लागू करावी तसेच मानधन १५००० रुपये देण्यात यावे. महसूलमधील विविध पदांमध्ये ४० टक्के प्राधान्य देण्यात यावे. कोरोनामध्ये मयत झालेल्या कोतवालांच्या वारसाला तत्काळ नियुक्ती देण्यात यावी. सेवानिवृत्त कोतवालांना पेन्शन लागू करावे.
अशा विविध मागण्यांचे निवेदन पाळधी येथे निवासस्थानी कोतवाल संघटनेने पालकमंत्र्यांना दिले असून आपण कोतवालांना चतुर्थश्रेणी कर्मचारी हा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.
यावेळी जिल्हाध्यक्ष सदानंद भदाणे, उपाध्यक्ष अमोल पाटील, धरणगाव तालुकाध्यक्ष शालिग्राम कुवर, रोहिदास पाटील, विजय कोळी, नवल पाटील, तबरेज खाटीक, राहुल शिरोळे, धनराज भोई, दीपाली पाटील, मनीषा सोनवणे, गोरख कोळी, नारायण सोनवणे, महेंद्र पाटील, शीतल पवार, आशिष कोल्हे व इतर कोतवाल उपस्थित होते.