कोविड संबधींची यंत्रणा पुन्हा सज्ज - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:43 AM2021-02-20T04:43:55+5:302021-02-20T04:43:55+5:30

जळगाव : जिल्ह्यात कोविड १९ साठी जी यंत्रणा आहे. ती पुन्हा सज्ज करण्यात आली आहे. त्यात डेडिकेटेड कोविड सेंटर, ...

Kovid related system re-equipped - Collector | कोविड संबधींची यंत्रणा पुन्हा सज्ज - जिल्हाधिकारी

कोविड संबधींची यंत्रणा पुन्हा सज्ज - जिल्हाधिकारी

Next

जळगाव : जिल्ह्यात कोविड १९ साठी जी यंत्रणा आहे. ती पुन्हा सज्ज करण्यात आली आहे. त्यात डेडिकेटेड कोविड सेंटर, कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा आपात्कालिन परिस्थितीसाठी तयार करण्यात आले आहेत. तसेच ॲम्ब्युलन्स देखील तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सायंकाळी आरोग्य विषयक बैठक पार पडली. त्यात राऊत यांनी संबधिंत अधिकाऱ्यांनी हे निर्देश दिले. राऊत यांनी सांगितले की, जिल्ह्यात १०८ या क्रमांकावर उपलब्ध होणाऱ्या ३२ रुग्णवाहिका आहेत. त्यांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच त्यातील चालक व इतर कर्मचाऱ्यांना कोविड बाबतचे प्रशिक्षण पुन्हा देण्यात येणार आहेत. त्यांना रुग्णांना कसे हाताळायचे याची माहिती देण्यात येणार आहे.’

Web Title: Kovid related system re-equipped - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.