धामणगावच्या आरोग्य केंद्रात ६६ जणांचे कोविड लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:16 AM2021-03-14T04:16:05+5:302021-03-14T04:16:05+5:30

ममुराबाद : परिसरातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ६६ जणांचे पहिल्या तीन दिवसांत लसीकरण केले आहे. त्यात ६० ...

Kovid vaccination of 66 people at Dhamangaon health center | धामणगावच्या आरोग्य केंद्रात ६६ जणांचे कोविड लसीकरण

धामणगावच्या आरोग्य केंद्रात ६६ जणांचे कोविड लसीकरण

Next

ममुराबाद : परिसरातील धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एकूण ६६ जणांचे पहिल्या तीन दिवसांत लसीकरण केले आहे. त्यात ६० वर्षांवरील ५२, आरोग्यसेवक १० तसेच फ्रंटलाईन वर्कर चार, यांचा समावेश आहे.

धामणगाव आरोग्य केंद्रात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार, जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. समाधान वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडाभरापासून कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

आरोग्य केंद्रावर ६० वर्षे वयावरील नागरिक तसेच ४५ वर्षे वयावरील कोमॉरबीड (मधुमेह, उच्चरक्तदाब व इतर दुर्धर आजारांनी ग्रस्त) नागरिकांना कोविड लसीकरणाचा लाभ विनामूल्य घेण्याची सोय केली आहे. व्याधिग्रस्तांना वैद्यकीय व्यावसायिकाचे प्रमाणपत्र अथवा नियमित उपचाराची फाईल सादर करणे आवश्यक आहे. लसीकरण आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान असते. जास्तीत-जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रम घोगले, डॉ. प्रतिभा बारी यांनी केले आहे.

Web Title: Kovid vaccination of 66 people at Dhamangaon health center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.