कु:हा येथील भगवा फाऊंडेशनचे पक्षीप्रेम
By admin | Published: March 31, 2017 04:30 PM2017-03-31T16:30:30+5:302017-03-31T16:30:30+5:30
तालुक्यातील कु:हा परिसरात येथील भगवा फाऊंडेशनच्यावतीने पक्षांसाठी वृक्षांवरील कुंडय़ामध्ये पाणी टाकून पाणी पिण्याची व्यवस्था फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी केली आहे.
Next
उन्हाळ्यात पाण्यासाठी वृक्षावर ठेवल्या कुंडय़ा
मुक्ताईनगर, दि.31- तालुक्यातील कु:हा परिसरात येथील भगवा फाऊंडेशनच्यावतीने पक्षांसाठी वृक्षांवरील कुंडय़ामध्ये पाणी टाकून पाणी पिण्याची व्यवस्था फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी केली आहे. सदस्यांनीच स्वत:च्या खचार्तील पैसे टाकून हा उपक्रम राबवण्याचा स्तुत्य उपक्रम गेल्या 20 दिवसांपासून सुरु केला आहे. विशेष म्हणजे दररोज पक्षांना पाणी मिळावे म्हणून प्रत्येकाने कुंडय़ांमध्ये पाणी पोहचवण्याचे जबाबदारी स्विकारली आहे. भगवा फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे परिसरात व तालुक्यातून कौतुक केले जात आहे.
उन्हाळ्यात पाण्याअभावी ब:याचदा पक्षी मरण पावतात म्हणून सालाबादाप्रमाणे फाऊंडेशनच्या सदस्य युवकांनी प्रत्येकी 100 रुपयेप्रमाणे गोळा केले. त्यातून कुंडय़ा आणण्यात आले. त्या कुंडय़ांना कु:हा, थेरोडा,धुपेश्वर रस्ता, भोटा रास्ता व वडोदा रस्ता अशा मार्गावरील मोठय़ा वृक्षांवर दोरीने बांधलेल्या कुंडय़ा लटकावल्या त्यात दररोज पाणी भरून पक्षांची तहान भागवली जात आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम स्वयंस्फूतीर्ने व मनापासून राबवला जात आहे.
फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रमोद सोंडे, उपाध्यक्ष नितीन खिरळकर, राजु जाधव, गणेश भोई, रवी गोरे, राहुल भोईटे, भोला खिरळकर, योगेश बोराखेडे, देविदास बोरसे , नीलेश नेमाडे, गजानन सोनोणे, विकास कांडेलकर, राहुल झाल्टे, गोविंदा पाटील, आकाश धाडे, हर्षल महाजन, पिटु कुकलारे, प्रविण बेलदार, रामेश्वर भोई, गजानन बेलदार, सागर गगत्रीरे , सोपान तायडे हे परिश्रम घेत आहेत.(वार्ताहर)