कुमारी प्रीतम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 07:11 PM2017-10-13T19:11:03+5:302017-10-13T19:11:25+5:30
‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये ‘बुक शेल्फ’ या सदरात रवींद्र मोराणकर यांनी करून दिलेला पुस्तकांचा थोडक्यात परिचय.
कुमारी प्रीतम डॉ.ज्ञानेश्वर जाधव यांचा कुमारी प्रीतम हा कथासंग्रह मूलभूत मानवी नात्यांचा शोध घेणारा आहे, असे म्हणता येईल. यातील भाषा साधी, सोपी आणि वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. लेखकाचा विचारधर्म जागवणा:या या कथांनी कृषी संस्कृतीशी असलेले ऋणानुबंध लेखकाने दाखविले आहेत. विशेष म्हणजे आध्यात्म हा लेखकाचा पिंड. या सर्व कथांचा भक्कम पाया या आध्यात्मावरच रचलेला दिसून येतो. महिलावर्गाविषयीचा तितकाच आदर या कथांमधून प्रकर्षाने जाणवतो. गोंडस बाळ या कथेतील नकारात्मक भूमिकेतील शांता ही भावाचा सुखी संसार उद्ध्वस्त करावयास जाते. असे असतानाही लेखकाने तिच्या व्यक्तीरेखा रेखाटताना मान राखला आहे. तिच्या स्त्रित्वाचा कोठेही उपमर्द, अपमान होऊ दिलेला नाही. देशातील महिलांनी आपल्या सद्भावनेने प्रसंगी हालअपेष्टा सहन करून, कोणत्याही संकटांशी सामना करून आपले थोरपण सिद्ध केले आहे. अशा सर्व थोर महिलांविषयी असलेली आदरयुक्त भावना लेखकाच्या शब्दा-शब्दांमधून व्यक्त होत कोठेही लपून राहिलेली नाही. लेखक : ज्ञानेश्वर जाधव, प्रकाशिका : संध्या राजेश बाहे, मूल्य : 120 रुपये खारंआलनं ‘खारंआलनं’ हा शिरपूर येथील समीक्षक डॉ.फुला बागूल यांनी लिहिलेला अहिराणी साहित्याची समीक्षा करणारा पहिला ग्रंथ आहे. सटाणा येथील अभ्यासक डॉ.सुधीर देवरे यांची प्रस्तावना, तर मलपृष्ठावरील अभिप्राय कन्नड येथील अभ्यासक डॉ.रमेश सूर्यवंशी यांनी नोंदवलाय. या समीक्षा ग्रंथात खान्देशातील 20 लेखक-कवींनी अहिराणीतून लिहिलेल्या 23 साहित्यकृतींची परखड समीक्षा डॉ.बागूल यांनी केलीय. कथा, कविता, कादंबरी, नाटक, ललित, गद्य, आत्मकथन संकलन, संशोधन व अहिराणी नियतकालिके या वा्मय प्रवाहातील साहित्य कृतींची समीक्षा या 174 पृष्ठसंख्येच्या ग्रंथात समाविष्ट आहे. ‘खारंआलनं’ हा अहिराणी समीक्षेचा पहिला खंड असून, त्यास सामाजिक दस्तावेजाचे स्वरूप असल्याचे जाणकारांनी म्हटलेय. अहिराणी साहित्याची सामथ्र्यस्थळे व दोषस्थळे अधोरेखित करणारा हा ग्रंथ आहे.लेखक : डॉ.फुला बागूल , प्रकाशक : प्रशांत पब्लिकेशन्स, मूल्य 195 रुपये