वीज तारांच्या स्पर्शाने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे ५ म्हशी दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2019 12:42 PM2019-08-06T12:42:16+5:302019-08-06T12:42:59+5:30

एक म्हैस गंभीर जखमी

At the Kusumba in Jalgaon taluka, with the touch of electricity wires, 3 buffaloes were burnt | वीज तारांच्या स्पर्शाने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे ५ म्हशी दगावल्या

वीज तारांच्या स्पर्शाने जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे ५ म्हशी दगावल्या

Next

जळगाव : तुटलेल्या वीज तारांना स्पर्श झाल्याने पाच म्हशी जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजता तालुक्यातील कुसुंबा शिवारात घडली. यात एक म्हैस गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
कुसुंबा गावातील धनराज रामकृष्ण पाटील (वय ६०) वास्तव्यास असून ते शेती करुन आपला उदरनिर्वाह भागवितात. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीच्या ४० म्हशी आहेत. या म्हशींना घेवून धनराज पाटील सोमवारी कुसुंबा शिवारात गेले. भास्कर शिवसिंग पाटील यांची शेताजवळ वीज खांबावरील तार तुटून जमिनीवर पडलेल्या वीजप्रवाह असलेल्या तारेला सहा म्हशींचा स्पर्श झाला. जोरदार धक्का बसल्याने म्हशी जमिनीवर पडल्या. याबाबत धनराज पाटील यांनी कुसुंबा गावात रवींद्र शांताराम पाटील, पोलीस पाटील राधेश्याम चौधरी यांना घटना सांगितली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल रतिलाल पवार व तलाठी वनराज पाटील यांनी घटनेचा पंचनामा केला.

Web Title: At the Kusumba in Jalgaon taluka, with the touch of electricity wires, 3 buffaloes were burnt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव