लाचखोर पोलिसाला कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 03:13 PM2019-04-15T15:13:32+5:302019-04-15T15:14:10+5:30

दोघे जण वैद्यकिय रजेवर

laacakhaora-paolaisaalaa-kaothadai | लाचखोर पोलिसाला कोठडी

लाचखोर पोलिसाला कोठडी

Next


जळगाव : लाचप्रकरणात अटकेतील संशयिताकडे संपत्तीची चौकशी न करण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला जिल्हा विशेष शाखेचा कर्मचारी विजय उर्फ बाळासाहेब छगनराव जाधव याला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जे. कटारिया यांनी १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मेहुणबारे, ता.चाळीसगाव येथील तत्कालिन मंडळाधिकारी यांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच प्रकरणात अटक केली होती. या काळात संपत्तीची चौकशी करु नये यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तत्कालिन निरीक्षक व सध्या नागपूर येथे सहायक निरीक्षक असलेले भिमा संभाजीराव नरके यांनी जिल्हा विशेष शाखेचे विजय जाधव, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे श्यामकांत जगन्नाथ पाटील व अरुण विठ्ठल पाटील यांनी ५ ते १२ मे २०१७ या कालावधीत संशयिताकडे प्रत्यक्ष तसेच मोबाईलवर पाच लाखाची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. खंडपीठाच्या आदेशाने शनिवारी मध्यरात्री चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी तथा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक जी.एम.ठाकूर यांनी विजय जाधव याला पहाटे अटक केली. रविवारी दुपारी न्यायालयात हजर केले. सरकारतर्फे अ‍ॅड.भारती खडसे यांनी बाजू मांडली.

दोघे जण वैद्यकिय रजेवर
या गुन्ह्यातील श्यामकांत जगन्नाथ पाटील व अरुण विठ्ठल पाटील हे दोन्ही कर्मचारी वैद्यकिय रजेवर असून त्यांची चौकशी केली जात आहेत. पुरावे हाती आल्यावर त्यांना अटक केली जाईल अशी माहिती तपासाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान,नरके हे नागपूर येथे कार्यरत आहेत.

Web Title: laacakhaora-paolaisaalaa-kaothadai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.