कष्टकऱ्यांच्या परिश्रमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:28 AM2021-03-13T04:28:17+5:302021-03-13T04:28:17+5:30

फोटो आहे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रोटरी क्लब, जळगावतर्फे नुकतीच रोटरी कम्युनिटी कॉर्प समितीची स्थापना करण्यात आली आहे. ...

To the labor of the toilers | कष्टकऱ्यांच्या परिश्रमाला

कष्टकऱ्यांच्या परिश्रमाला

Next

फोटो आहे

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रोटरी क्लब, जळगावतर्फे नुकतीच रोटरी कम्युनिटी कॉर्प समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याअंतर्गत दाणाबाजार येथील गरीब, होतकरू हमाल बांधवांना मदतीचा हात देऊन हातगाडीचे वाटप करण्यात आले.

कोरोनाच्या काळात कष्टकरी जनतेसमोर आर्थिक अडचणी येत आहेत. स्वाभिमानाने काम करणाऱ्या हमाल बांधवांना मदत व्हावी या हेतूने रोटरी क्लब, जळगावने या उपक्रमाचे आयोजन केले होते. उपक्रमांतर्गत हमाल बांधवांना हातगाडीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी ‘रोटरी’चे अध्यक्ष जितेंद्र ढाके, सेक्रेटरी डॉ. काजल फिरके, किशोर तलरेजा, डॉ. तुषार फिरके, मोहन कुलकर्णी, योगेश गांधी, ॲड. श्रीकांत भुसारी, राजू आडवाणी, आसिफ मेमन, दिलीप जैन, श्याम अग्रवाल, आशुतोष पाटील, मनीष झंवर, शेषराव अप्पा वेलकर व दाणाबाजारातील हमाल बांधव उपस्थित होते.

Web Title: To the labor of the toilers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.