१५ मे पर्यंत प्रयोगशाळा सुरू होण्याची शक्यता - अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2020 12:34 PM2020-05-03T12:34:20+5:302020-05-03T12:34:36+5:30

‘लोकमत’च्या मुलाखतीत विविध माहिती

The laboratory is likely to start by May 15 | १५ मे पर्यंत प्रयोगशाळा सुरू होण्याची शक्यता - अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे

१५ मे पर्यंत प्रयोगशाळा सुरू होण्याची शक्यता - अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे

Next

आनंद सुरवाडे 
जळगावातील कोविड रूग्णालयात कोरोना तपासणी प्रयोगशाळा ही येत्या १५ मे पर्यंत सुरू होण्याची शक्यता असून तसे आमचे  पूर्ण प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांनी दिली़ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत  त्यांनी  विविध विषयांवर संवाद साधला यावेळी त्यांनी ही माहिती दिली़
प्रश्न : कोरोना तपासणी प्रयोगशाळेची स्थिती काय?
डॉ़ खैरे : कोरोना तपासणी प्रयोगशाळेसाठी ९० टक्के बांधकाम पूर्ण झालेले आहे़ येत्या दोन दिवसात हे बांधकाम पूर्ण होणार आहे़ जी कंपनी मशिनरी देणार आहे़, त्या कंपनीसोबत शनिवारीच  बोलणे झाले असून दहा तारखेपर्यंत ते मशिन उपलब्ध करून देणार आहेत़  डॉक्टर व टेक्निशियन असे दोन टप्प्यात धुळे व औरंगाबाद येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे़ एक बॅच ४ एप्रिलपासून औरंगाबाद येथे  प्रशिक्षणाला जाणार आहे़ १५ मे पर्यंत प्रयोगशाळा सुरू करण्याचे आमचे पूर्ण प्रयत्न आहेत़
प्रश्न : कोविड रुग्णालयातील असुविधांबाबतच्या तक्रारी समोर येत आहेत, त्याबाबत आपण काय
सांगाल ?
डॉ़ खैरे : हे दुर्देवी आहे़ कोविड रुग्णालय झाल्यापासून सर्व कक्षांमध्ये स्वच्छता, नवीन कॉट, स्वच्छ गाद्या, पिण्याचे पाणी या सर्व सुविधा  देण्याचा पुरेपूर आमचा प्रयत्न आहे व आम्ही त्या देतही आहोत़ अतिदक्षता विभाग आधी दहा खाटांचा होता़ त्याचे विस्तारीकरण करून  तीस खाटांचा सुसज्ज असा अतिदक्षता विभाग आहे़ व्हँटिलेटर व आॅक्सिजन सिलेंडर पुरेशे आहेत़ औषधींचा साठा मुबलक आहे़  मनोरंजनासाठी टीव्ही आहेत केवळ डिश जोडणी बाकी असून तेही लवकरच करणार आहोत़ स्वतंत्र बाह्यरुग्ण विभागही आहे़ बाधित रुग्णांसाठी  स्वतंत्र कक्ष आहेत़ स्वच्छतेवर पुरेपूर भर दिला जात आहे़ ज्या सुविधा आधी नव्हत्या त्या कोविड रुग्णालयात दिल्या जात आहेत़

मृत्यूचा आकडा का वाढतोय?
मृत्यूचा आकडा वाढतोय असे म्हणता येणार नाही़ आताच त्याची टक्केवारीही काढता येणार नाही़ शिवाय बाधित बारा मृतांपैकी जवळपास सर्वच ६० वर्षावरील होते़ दोघांचा मृत्यू हा रुग्णालयात आणण्या आधीच झालेला होता़ एक दोन रुग्ण सोडले तर सर्वच रुग्णांना अनेक व्याधी होत्या़ काहींना हृदयरोग, काहींना टीबी, मधुमेह असे आजार होते़ अत्यंत गंभीर परिस्थितीत हे रुग्ण दाखल होत होते़ आधीच अन्य व्याधी व कोरोनाची लागण झाल्याने अशा रुग्णांची प्रतिकार क्षमता कमी असल्याने उपचारास प्रतिसाद देत नाहीत व त्यामुळे मृत्यू होतो़
लोकांनी स्वत:हून पुढे येऊन न घाबरता तपासणी करून घ्यावी, बाधितांनी त्यांच्या प्रवासाचा इतिहास किंवा कोणाकोणाशी संपर्क आला हे  अजिबात लपवू नये, शासनाच्या नियमांचे पालन करून घरीच थांबावे - डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता
लोकांनी स्वत:हून पुढे येऊन न घाबरता तपासणी करून घ्यावी, बाधितांनी प्रवासाचा इतिहास किंवा कोणाकोणाशी संपर्क आला हे अजिबात लपवू नये, शासनाच्या नियमांचे पालन करून घरीच थांबावे
- डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता

Web Title: The laboratory is likely to start by May 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव