पालिकेला पावणेतीन लाखांचा चुना

By admin | Published: January 6, 2017 12:34 AM2017-01-06T00:34:37+5:302017-01-06T00:34:37+5:30

सुलभ शौचालय योजनेचे बनावट लाभार्थी : जामनेर मुख्याधिका:यांची लेखी तक्रार

Lack of Lakhs to the Municipal Corporation | पालिकेला पावणेतीन लाखांचा चुना

पालिकेला पावणेतीन लाखांचा चुना

Next

जामनेर : गेल्या वर्षभरापासून हगणदरीमुक्तीसाठी नगरपालिका प्रशासनातर्फे एकीकडे जोरदार प्रय} केले जात असले तरी दुस:या बाजूने पालिकेच्या एका चांगल्या योजनेला नियोजित पद्धतीने पोखरणेही सुरू आहे.
 त्याचा प्रत्यय शहरात  नागरिकांना वैयक्तिक  शौचालय बांधण्यासाठी दिले जाणारे अनुदान बोगस लाभार्थीनी लाटण्याच्या उघड झालेल्या प्रकारावरून दिसत आहे. सुमारे  26 बनावट लाभाथ्र्यानी शौचालयाचे कुठलेही बांधकाम न करता किंवा अध्र्यावर सोडून देत तब्बल पावणेतीन लाखांचे अनुदान उपटून नगरपालिकेला चुना लावण्याचा प्रकार केल्याचे पालिका सूत्रांकडून सांगण्यात आले.
दरम्यान,  याप्रकरणी प्रत्यक्ष चौकशी करून मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी पालिकेची फसवणूक करणा:या सर्व बनावट लाभाथ्र्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस निरीक्षक नजीर शेख यांचेकडे लेखी तक्रार केली आहे.
अनेकवेळा सूचना देऊनही                 बांधकाम नाही
शौचालये न बांधताच अनुदान उपटल्याच्या कृत्याची चर्चा शहरात ब:याच दिवसांपासून सुरू होती.  त्याची दखल घेऊन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी आलेली सर्व प्रकरणे तपासून पाहिली असता आणि प्रत्यक्षात जागेवरील परिस्थितीची शहानिशा केली असता अनुदान देण्यात आलेल्या अनेकांनी  शौचालयाचे बांधकामच केलेले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे शहरात दवंडी देऊन संबंधितांना लेखी सूचना देण्यात आली. त्यानंतर काही जणांनी पैसे नगरपालिका प्रशासनास परत केले. मात्र काही  बनावट लाभार्थी पैसे परत देण्यासाठीही आले नाहीत की त्यांनी शौचालयांचे बांधकामही  केले  नाही.
  संबंधित सूत्रांनी पुढे सांगितले की, यामध्ये शिवदास कांबळे (17000), शोभाबाई परदेशी (17000), कैलास  माळी (17000), सुनंदाबाई  जगताप (17000), नथ्थू  नेरकर (17000), दत्तात्रय माळी (17000), लताबाई  माळी (17000), रजीयाबी नासिरखान (17000), सै.इलियास सै.नूर (17000), रेखाबाई  कोळी (17000), सुनील लोहार (6000), सुशिलाबाई   खाटीक  (6000),  कृष्णा   मिस्तरी (6000),  ईश्वर  भोलाणे (6000), युवराज  कचरे (6000), नंदलाल   रिचवाल (6000), अलकाबाई  मराठे (6000), नारायण येणे (6000), नारायण  भोपळे  (6000), जिजाबाई   सुरळकर (6000),  विनायक  सुरळकर  (6000), रवींद्र   माळी (6000), वंदना  पाटील (6000), उमाबाई   शिंदे (6000), पुष्पाबाई पाटील (6000) अशा एकूण 26 लाभाथ्र्याचा समावेश असल्याची माहिती न.पा. प्रशासनाने दिली आहे.  (वार्ताहर)

Web Title: Lack of Lakhs to the Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.