शौचालय न बांधणा:यांवर गुन्हे दाखल होणार

By admin | Published: January 12, 2017 12:51 AM2017-01-12T00:51:29+5:302017-01-12T00:51:29+5:30

चोपडा : शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान घेऊनही शौचालय बांधले नाही अशांवर नगरपालिका शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे संबंधितांना नोटिसद्वारे कळविले आहे.

Lack of toilets: The cases will be filed against them | शौचालय न बांधणा:यांवर गुन्हे दाखल होणार

शौचालय न बांधणा:यांवर गुन्हे दाखल होणार

Next


चोपडा : शौचालय बांधकामासाठी शासनाकडून अनुदान घेऊनही शौचालय बांधले नाही अशांवर  नगरपालिका शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे संबंधितांना नोटिसद्वारे कळविले आहे.
   ज्या नागरिकांनी शौचालय बांधले नाही, अशांना महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र नागरी अभियानांतर्गत वैय्यक्तिक शौचालय बांधकामासाठी शासनाकडून प्रत्येकी 12 हजार रूपये  व नगरपालिकेकडून एक हजार रुपये असे एकत्रित 13 हजार रूपये  दिले जातात.
 पालिकेमार्फत एकूण 1605 लाभाथ्र्यांनी यासाठी लाभ घेतला आहे. मात्र त्यापैकी 927 लाभाथ्र्यांनी शौचालय बांधले आहेत.आणि 584 लाभाथ्र्यांनी प्रत्येकी प्रथम टप्प्यातील 6000 रूपये पालिकेकडून अनुदान घेऊनही शौचालय बांधले नाहीत. अशा लाभाथ्र्यांना पालिकेतर्फे नोटीस बजवण्यात आली आहे.व गुन्हा दाखल केले जाणार असल्याचे सुचविले आहे.
 491 लाभाथ्र्यांवर अनुदान घेऊन शौचालय न बांधल्यामुळे अनुदानाचा गैरवापर केल्याप्रकरणीही प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कम वसूल करणेसाठी चोपडा शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम 420,406,417 या कलमान्वये गुन्हे दाखल होणार असल्याच्या हालचाली सुरु आहेत.
उघड्यावर शौचास बसणा:यांवही दाखल होणार गुन्हा
   शहरातील झोपडपट्टी भागात  नागरिकांनी उघडयावर शौचास बसू नये यासाठी आरोग्य विभागामार्फत समुपदेशन करणे सुरू आहे. वराड रोड लगत असलेल्या झोपडपट्टीत भागात  जाऊन तीन घरे मिळून एक टाकी बांधून प्रत्येकाला घरात शौचालय बांधून देण्यासाठी पालिकास्तरावर योजना आखली असल्याने बहुतांश झोपडपट्टी भागात आता शौचालय बांधले जाणार असल्याचे आरोग्य अधिकारी व्ही. के. पाटील यांनी सांगितले.
तसेच यापुढे जे लोकं उघडय़ावर शौचास बसतील  अशांवर कलम 115,117 अन्वये (आर्थिक दंड आणि 3 महिने शिक्षेची तरतूद असलेले) गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे उघडय़ावर शौचास बसणा:यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झालेली आहे. पालिकेने सक्तीने कारवाई करावी. कारवाईत सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.    (वार्ताहर)

Web Title: Lack of toilets: The cases will be filed against them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.