खाण्यास अयोग्य असलेला सव्वा लाखाचा खवा जळगावच्या बसस्थानकात केला जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 10:39 PM2017-10-12T22:39:14+5:302017-10-12T22:41:42+5:30

बीड जिल्ह्यातून जळगाव शहरात येणारा  १ लाख ३३ हजार रुयपांचा ७४५ रुपये किमतीचा ७९१ किलो खवा गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाने नवीन बसस्थानकात जप्त केला. पंचनाम्याची कारवाई झाल्यानंतर दुपारी हा खवा नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद शहा यांनी ‘लोकमत’ दिली.

The lacquer was found in the Jalgaon bus stand | खाण्यास अयोग्य असलेला सव्वा लाखाचा खवा जळगावच्या बसस्थानकात केला जप्त

खाण्यास अयोग्य असलेला सव्वा लाखाचा खवा जळगावच्या बसस्थानकात केला जप्त

Next
ठळक मुद्दे एफडीएची कारवाई  असुरक्षित वाहतूकीमुळे खाण्यास अयोग्यकारवाईनंतर खवा केला नष्ट


आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : बीड जिल्ह्यातून जळगाव शहरात येणारा  १ लाख ३३ हजार रुयपांचा ७४५ रुपये किमतीचा ७९१ किलो खवा गुरुवारी अन्न व औषध प्रशासनाने नवीन बसस्थानकात जप्त केला. पंचनाम्याची कारवाई झाल्यानंतर दुपारी हा खवा नष्ट करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त मिलिंद शहा यांनी ‘लोकमत’ दिली.


बीड जिल्ह्यातील काही शेतकºयांनी तयार केलेला खवा एस.टी.बसच्या टपावर व बसमधील शेवटच्या सीट खाली ठेऊन येत असल्याची माहिती सहायक आयुक्त शहा यांना मिळाली होती. त्यानुसार शहा यांनी अन्न सुरक्षा अधिकारी संदिप देवरे व ए.के.गुजर यांना बसस्थानकात सापळा लावण्याचे आदेश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार परळी-भुसावळ ही बस नवीन बसस्थानकात येताच पथकाने त्याची तपासणी केली असता एका गोणपाटात ७९१ किलो खवा आढळून आला. या खव्याची वाहतूक पाहता तो खाण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले. योगेश मुरारीलाल अग्रवाल (रा.विसनजी नगर, जळगाव), अनिल यशवंत सावंत (रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) व बबलु रामदास यादव यांच्याकडे हा खवा येत होता. 


नमुने प्रयोग शाळेत पाठविले दरम्यान, या खव्याचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून खवाही नष्ट करण्यात आला आहे.  दिवाळीच्या पार्श्वभूमीवर खाण्यास अयोग्य असलेल्या खव्याची बाहेरुन मोठ्या प्रमाणात शहरात आयात होते. त्यामुळे असा खवा रोखण्यासाठी अन्न व औषध विभागाचे पथक कारवाईसाठी सज्ज झाले असून दुकानांचीही तपासणी केली जात आहे.

Web Title: The lacquer was found in the Jalgaon bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.