चाळीसगावला गुरुजींच्या दातृत्वातून लादी स्वच्छता यंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:12 AM2021-06-01T04:12:41+5:302021-06-01T04:12:41+5:30

चाळीसगाव : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी कोरोनाकाळात आपल्याला ...

Ladi cleaning machine donated by Guruji to Chalisgaon | चाळीसगावला गुरुजींच्या दातृत्वातून लादी स्वच्छता यंत्र

चाळीसगावला गुरुजींच्या दातृत्वातून लादी स्वच्छता यंत्र

Next

चाळीसगाव : पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या पुढाकाराने चाळीसगाव तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी कोरोनाकाळात आपल्याला दातृत्वाचा परिचय देत मेडिकल दृष्टीने उपयोगी वस्तू कोविड निधी जमा करून भेट दिल्या. नुकतेच लादी स्वच्छता यंत्रही भेट देण्यात आले आहेत.

काही दिवसांपूर्वीच सात ऑक्सिजन काॅन्सन्ट्रेटर खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांना दिले. रविवारी ट्रामा केअर सेंटर येथे याच कोविड निधीमधून ऑटोमॅटिक लादी सफाई मशीन भेट दिले. या सफाई मशीनच्या लोकार्पणप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, गटशिक्षणाधिकारी विलास भोई, पंचायत समिती सभापती अजय पाटील, उपसभापती सुनील पाटील, पंचायत समिती गट नेते संजय पाटील, माजी सभापती दिनेश बोरसे, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरपालिका गटनेते संजय रतनसिंग पाटील, नगरसेवक राजेंद्र चौधरी, भाजप शहराध्यक्ष नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, नगरसेविका विजया पवार, रिपब्लिकन पक्षाचे नेते नगरसेवक आनंद खरात, बापू अहिरे, जितेंद्र वाघ, अमोल चव्हाण, बबन पवार, अमोल चौधरी, रोहन सूर्यवंशी, चेतन पाटील यांच्यासह अजित पाटील, विश्वास सूर्यवंशी, महेंद्रसिंह सिसोदे, दिलीप सावंत, विनायक ठाकूर, चंद्रमणी पगारे, विजय निकम, राजेंद्र पाटील, भय्यासाहेब वाघ, नितीन खंडाळे, पंढरीनाथ पवार, पंकज रणदिवे आदी शिक्षक उपस्थित होते. प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी विलास भोई यांनी केले. सूत्रसंचालन भय्यासाहेब वाघ व आभार विजय निकम यांनी मानले.

Web Title: Ladi cleaning machine donated by Guruji to Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.