म्हणून ‘लाडक्या बहिणीं’ना आधीच पाच हप्ते दिले, नंतर दोन हजार रुपये देणार: मुख्यमंत्री शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 12:45 PM2024-10-22T12:45:07+5:302024-10-22T12:45:55+5:30

चंद्रकांत पाटील यांना शिंदेसेनेतर्फे उमेदवारी; मुक्ताईनगर येथे सोमवारी झाला महायुतीचा मेळावा

Ladki Bahin Yojana already paid five installments then Rs 2000 said CM Eknath Shinde | म्हणून ‘लाडक्या बहिणीं’ना आधीच पाच हप्ते दिले, नंतर दोन हजार रुपये देणार: मुख्यमंत्री शिंदे

म्हणून ‘लाडक्या बहिणीं’ना आधीच पाच हप्ते दिले, नंतर दोन हजार रुपये देणार: मुख्यमंत्री शिंदे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुक्ताईनगर (जि. जळगाव): लाडकी बहीण योजना कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही, याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना दीड हजारऐवजी दोन हजार रुपये मिळतील, असे आश्वासन दिले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचेही त्यांनी जाहीर केले.

मुक्ताईनगर येथे सोमवारी महायुतीचा मेळावा झाला. त्यावेळी शिंदे बोलत होते. ते म्हणाले, लाडकी बहीण योजनेला विरोधक खोडा घालतील म्हणून आधीच पाच हप्ते बहिणींच्या बँक खात्यात जमा केले आहेत.

चंद्रकांत पाटील यांना शिंदेसेनेतर्फे उमेदवारी

मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यांनी या मेळाव्यात शिंदेसेनेत प्रवेश केला. यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी महायुतीतर्फे त्यांची उमेदवारी  जाहीर केली.
आपले सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. त्यामुळे मी सीएम नाही, तर कॉमन मॅन आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. राज्य सरकारने तीर्थयात्रेसारख्या विविध लोककल्याणकारी योजना सुरू केल्याने  विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकत चालली आहे, अशी टीकाही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.

Web Title: Ladki Bahin Yojana already paid five installments then Rs 2000 said CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.