लखपती दीदी मेळावा : पोलिसांनी ४०० बसेस अडवल्यानंतर महिला पायी निघाल्या
By Ajay.patil | Updated: August 25, 2024 12:48 IST2024-08-25T12:47:39+5:302024-08-25T12:48:09+5:30
नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगावात होत असलेल्या लखपती दीदी मेळाव्यासाठी राज्यभरातून लाभार्थी महिलांचे आगमन एसटी बसेसद्वारे झाले आहे.

लखपती दीदी मेळावा : पोलिसांनी ४०० बसेस अडवल्यानंतर महिला पायी निघाल्या
जळगाव - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज जळगावात होत असलेल्या लखपती दीदी मेळाव्यासाठी राज्यभरातून लाभार्थी महिलांचे आगमन एसटी बसेसद्वारे झाले आहे. परंतु सभास्थळी पोहोचण्यात त्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
पोलिसांनी जळगाव टोल नाका या ठिकाणी रस्ता बंद केल्यामुळे अद्याप ४०० हून अधिक बसेस रांगेत उभ्या आहेत. महिलांना बसेसमधून उतरून सभा स्थळापासून चार किमी अंतरापर्यंत पायी जावे लागत आहे. पाऊस आणि वाहतूक कोंडीमुळे महिलांचे हाल होत आहेत, अशी परिस्थिती आहे.