मतदानाच्या धामधुमीत लाखो रुपयांची अवैध दारु पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 09:37 PM2019-04-23T21:37:28+5:302019-04-23T21:38:50+5:30
राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक गुन्हे शाखा यांनी मंगळवारी संयुक्ती मोहिम राबवून चिंचोली, ता.जळगाव व एमआयडीसी भागात अवैधरित्या विक्री होणारी लाखो रुपये किमतीची दारु व बियर जप्त केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : राज्य उत्पादन शुल्क व स्थानिक गुन्हे शाखा यांनी मंगळवारी संयुक्ती मोहिम राबवून चिंचोली, ता.जळगाव व एमआयडीसी भागात अवैधरित्या विक्री होणारी लाखो रुपये किमतीची दारु व बियर जप्त केली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीमुळे दारु दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतानाही चिंचोली, ता.जळगाव येथे सागर बियर शॉपी सुरु ठेवून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरुन परिविक्षाधीन उपअधीक्षक सचिन कदम, राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक नरेंद्र दहिवडे, दुय्यम निरीक्षक व्ही.एम.पाटील, एस.ए.वानखेडे, रघुनाथ सोनवणे, गिरीश पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार विजय पाटील, रवींद्र गिरासे, दिनेश बडगुजर, सुनील दामोदरे, प्रकाश महाजन, दत्तात्रय बडगुजर, शिवाजी पाटील, नरेंद्र वारुळे, दीपक चौधरी, मिनल साकळीकर व दिप्ती अनफट यांच्या पथकाने चिंचोली येथे छापा मारला. तेथे ६२८ बियरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याची किमत ९० हजार ५०० रुपये आहे. त्यानंतर रामेश्वर कॉलनीत विनोद अशोक महाजन याच्याजवळ ८ हजार ९८४ रुपये किमतीची देशी व विदेशी दारु आढळून आली.