जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई यात्रोत्सवात लाखो भाविक वारकऱ्यांनी फुलविला भक्तीचा मळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 04:06 PM2019-03-02T16:06:54+5:302019-03-02T16:08:27+5:30

माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्री पर्वकाळावर वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी संत मुक्ताबाई श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे शनिवारी चांगदेव मुक्ताबाई यात्रोत्सवात ३०० पायी दिंड्यांसह लाखावर भाविक दाखल झाले आहेत. हरी नामाचा गजर आदिशक्ती मुक्ताई चा जयघोषात टाळ मृदुंगाच्या निनादाने मुक्ताईनगर दुमदुमून गेले.

Lakhs of pilgrims from the Muktai Yatra of Jalgaon district have flown to the temple of devotion | जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई यात्रोत्सवात लाखो भाविक वारकऱ्यांनी फुलविला भक्तीचा मळा

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई यात्रोत्सवात लाखो भाविक वारकऱ्यांनी फुलविला भक्तीचा मळा

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यातील विविध भागातून ३०० दिंड्या दाखलदिंड्याच्या फडावरील चैतन्य मनोहारीदर्शन बारीत दरवर्षीपेक्षा या वेळेस मोठ्या प्रमाणावर गर्दीमानाच्या वारकऱ्यांचा झाला सन्मान

मतीन शेख
मुक्ताईनगर, जि.जळगाव : माघ कृष्ण विजया एकादशी व महाशिवरात्री पर्वकाळावर वारकरी संप्रदायाचे संत शिरोमणी संत मुक्ताबाई श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे शनिवारी चांगदेव मुक्ताबाई यात्रोत्सवात ३०० पायी दिंड्यांसह लाखावर भाविक दाखल झाले आहेत. हरी नामाचा गजर आदिशक्ती मुक्ताई चा जयघोषात टाळ मृदुंगाच्या निनादाने मुक्ताईनगर दुमदुमून गेले. शेकडो मैल पायी चालत संत दर्शनाची ओठ घेऊन आलेल्या वारकऱ्यांचा मुक्ताई दर्शनानंतर भक्ती आणि श्रद्धेचा निस्सीम आनंद याची देही याची डोळा साठवावा असा होता
एकादशी पर्वा काळावर भाविकांनी मुक्ताई पायथ्याशी व तापी पूर्णा संगमावर स्नान केले. पहाटे चार वाजता आदिशक्ती मुक्ताईचे मानकरी व अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील यांनी संत मुक्ताबाई महाअभिषेक केला. पाच वाजता खासदार रक्षा खडसे व मानाचे वारकरी मधुकर रघुनाथ नारखेडे निमखेड, जि.बुलढाणा यांनी मुक्ताई अभिषेक व आरती केली. यावेळी महानंदा दूध फेडरेशन चेअरमन मंदा खडसे, कोथळी पोलीस पाटील संजय चौधरी, व्यवस्थापक उद्धव जुनारे, प्रा. निन झोपे, पुजारी विनायक व्यवहारे महाराज उपस्थित होते.
संत मुक्ताई नवीन मंदिरात पहाटे चार वाजता संस्थानचे विश्वस्त पंजाबराव पाटील यांनी सपत्नीक महापूजा केली. पौराहित्य रवींद्र महाराज हरणे यांनी केले.
दरम्यान, पहाटे पाचपासून भाविकांनी मुक्ताई पायथ्याशी जलाशयात श्रद्धेची डुबकी लावून भाविकांनी मंदिराकडे मुक्ताई दर्शनासाठी धावा केला. हजारो भाविक दर्शनबारीत रांगा लावून उभे होते तर कालपासून येथे दाखल झालेल्या शेकडो पायी दिंड्या व मुक्कामी आलेल्या वारकºयांची संत मुक्ताई दर्शनाची ओढ स्फूर्ती देणारी चैतन्यदायी होती. दोन्ही ठिकाणच्या मंदिर परिसरात भाविकांचा मुक्ताई दर्शनाचा उत्साह ओसंडून वाहत होता. नवे मुक्ताई मंदिरा च्या प्रशस्त सभामंडपा बाहेर दिंड्यांना देण्यात येणाºया निर्धारीत वेळेत वारकरी भजन कीर्तन जयघोषाने परिसर दणाणला होता. अगदी भारुड, फुगडी करून वारकरी संत भक्तीत बेभान व तल्लीन झाल्याचे चित्र उमटून येत होते. पायी दिंडीच्या नगरप्रदक्षिणाने मुक्ताईनगरचे मुख्य रस्ते वारकºयांनी फुलले होते. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलाचा जयघोष टाळमृदंगाचा गजर शिस्तीने श्रद्धेने व भक्ती भावाने तल्लीन झालेल्या वारकºयांनी शहरभर आध्यात्मिक आनंदाची उधळण केली आणि शहर भक्तीरसात चिंब झाले.
यंदाच्या यात्रोत्सवात तिनशेवर दिंड्यांनी श्री क्षेत्र मुक्ताईनगर व कोथळी स्थित नवीन व जुन्या मंदिरात हजेरी लावल्याने संपूर्ण मुक्ताईनगरी दुमदुमल्याचा अनुभव शहरवासीयांनी घेतला व भक्तिमय वातावरण सर्वत्र पसरले.
महाराष्ट्रातील कानाकोपºयासह मध्य प्रदेशातील खंडवा तसेच बºहाणपूर जिल्ह्यातील पायी दिंड्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाले आहे. नवीन मुक्ताई मंदिरावरच जवळपास १५० दिंड्यांचे फड पडले असून, भजन व कीर्तन सोहळे सुरू आहेत.
दर्शन बारी- दरवर्षीपेक्षा या वेळेस मोठ्या प्रमाणावर गर्दी असल्याचे दिसून येत ३०० दिंड्यांसह दोन लाख भाविकांनी मुक्ताईचे दर्शन घेतले. दर्शन लांबलचक लागली होती. दर्शन बारीचे नियोजन कौतुकास्पद होते. दर्शनबारीमध्ये पाण्याची व्यवस्था मुक्ताईनगर सिव्हील सोसायटीने केली आहे.
पुस्तक विक्री- यात्रोत्सवात मोठ्या प्रमाणावर धर्म व वारकरी ग्रंथ, सााहित्य विक्री मोठ्या प्रमाणावर झाली. यात हरिपाठ, तुकाराम गाथा, भागवत यासह वारकरी साहित्य भाविक खरेदी करत होते. तुळशीमाळा, गोपीचंदन व कुमकुम याची दुकाने थेट पंढरपूर येथून आले होते,
भांड्याची दुकाने- यात्रोत्सवात भांड्याची दुकाने एक आकर्षणाचा विषय आहे. खान्देशाचा यात्रोत्सवात या बाजाराचा दुसरा क्रमांक लागतो.
ग्रामीण भागातील पंचायत, मंडळ व खासगी वापराची घरगुती भांडे लोक मोठ्या प्रमाणात या यात्रेतून खरेदी करतात.या यात्रोत्सवात घरघुती लहान भांड्यापासून, कढई, चमचे सरोटा, तांबा व पितळाची भांड,े समई दिवे येथे मिळतात
दिंड्याच्या फडावरील चैतन्य-
शेकडो मैल मुक्ताई भेटीचा ओढीने पायी चालत येणाºया वारकºयांना मुक्ताई भेटीचा आनंद खूप मोठा असतो. दशमीला पोहचलेल्या दिंड्या नगरप्रदिक्षणा घातल्यानंतर मुक्ताई दरबारी दाखल होतात. दर्शन घेतल्यावर आपल्या मुक्कामाचा फडावर पोहचतात. रात्री उशिरापर्यत कीर्तन, भजन, हरिनामाचा गजर सुरु असतो. फडावरील टाळ मृंदगाचा गजरात सुरु असलेली पावली असो कि थकवा दुर करणारी भारुडे असो या मध्ये वारकरी तल्लीन होतात. वारकºयांच्या चेहºयावर भक्तीचा आनंद ओसंडून वाहत असल्याचे चित्र असते.
ठिकठिकाणी फराळ वाटप-नवीन मंदिरात आजच्या फराळाची व्यवस्था मुरलीधर गंगाराम पाटील रा.केºहाळा यांनी केली होती. मुक्ताई मंदिर परिसरात खडसे परिवाराकडून फराळ वाटप करण्यात आले. विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांतर्फे फराळ वाटप करण्यात आले. यासह अनेक मंडळातर्फे ठिकठिकाणी पालख्या व वारकºयांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आले, तर शहरात अनेक मान्यवरांनी परंपरेने त्यांच्याकडे येणाºया दिंड्यांचे स्वागत करून फराळ वाटप केले.
सुरक्षा- मुक्ताई मंदिर परिसरात भाविकांना सेवा देण्यासाठी ६० स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. त्यात ३० महिला कर्मचारी आहेत. पोलीस बदोबस्त चोख आहे.
बस सेवा- मुक्ताई यात्रोत्सवानिमित्त मुक्ताई मंदिर, चांगदेव मंदिर तसेच परिसरात जादा बसेस सुरू करण्यात आल्या आहेत.
महाशिवरात्री दिनी ४ रोजी आदिशक्ती संत मुक्ताबाई आपल्या लाडक्या शिष्य योगी चांगदेव भेटीसाठी वारकरी दिंड्यांसह चांगदेव गावी जातील.
मानाचे वारकरी सत्कार
संत मुक्ताबाई पूजा आरतीचा मान यावर्षी सुशीला व मधुकर रघुनाथ नारखेडे रा. निमखेड, जि.बुलढाणा या वारकरी दांपत्याला मिळाला. त्यांचा सन्मान संस्थान अध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व खासदार रक्षा खडसे यांनी महावस्त्र, मुक्ताबाई प्रतिमा व ग्रंथ देवून केला.

Web Title: Lakhs of pilgrims from the Muktai Yatra of Jalgaon district have flown to the temple of devotion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.