‘लाळ्या खुरकूत’चा घोटणार गळा, आजपासून प्रत्येक तालुक्यात होणार लसीकरणाला सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 18:37 IST2024-01-02T18:37:33+5:302024-01-02T18:37:58+5:30
जनावरांवर आक्रमण करणाऱ्या लाळ्या खुरकतचा नाश करण्यासाठी ९ लाखांवर ‘डोस’ प्राप्त

‘लाळ्या खुरकूत’चा घोटणार गळा, आजपासून प्रत्येक तालुक्यात होणार लसीकरणाला सुरूवात
कुंदन पाटील/ जळगाव: थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांवर आक्रमण करणार ‘लाळ्या खुरकूत’ या संसर्गजन्य रोगाला आवर घालण्यासाठी बुधवारपासून जिल्हाभरात लसीकरणाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी ९ लाखांवर डोस प्राप्त झाले आहेत.
खुरकुताची लागण झाली की जनावर शांत राहते. नियमितपणे चारा खात नाही. पाणी पिणे बंद करते. दुभते जनावराचे दुधाचे प्रमाणही कमी होते. जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जीभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते तर पुढच्या पायांच्या मध्यभागी फोड येतात. गाभण जनावराच्या मागच्या पायात फोड आले तर अपंगत्वसुध्दा येऊ शकते. ही लक्षणे जाणवण्याआधीच लसीकरण केल्यास या संसर्गजन्य आजारापासून मुक्ती मिळते.
तालुकानिहाय जनावरे आणि प्राप्त लसींचे डोस-
- अमळनेर-५५३८१-४७१००
- भडगाव-४८९१६-४१६००
- भुसावळ-२८२१०-२४०००
- बोदवड-२१४९५-१८३००
- चाळीसगाव-१२४९८२-१०६२००
- चोपडा-५७१६१-४८६००
- धरणगाव-३१२४६-२६५००
- एरंडोल-४२७४६-३६३००
- जळगाव-५१०९९-४३४००
- जामनेर-८८०९०-७४९००
- मुक्ताईनगर-४६२१०-३९३००
- पाचोरा-६८२८०-५८६००
- पारोळा-६८९६७-५८६००
- रावेर-५७६४४-४९०००
- यावल-५५९८०-४७६००