बंद घरातून दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:13 AM2021-06-06T04:13:45+5:302021-06-06T04:13:45+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि. ३ रोजी सायंकाळी साडेचार वाजता विकास बोरसे हे नातेवाईकांच्या हळद व लग्नाच्या ...
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि. ३ रोजी सायंकाळी साडेचार वाजता विकास बोरसे हे नातेवाईकांच्या हळद व लग्नाच्या कार्यासाठी धुळे येथे गेल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते.चोरट्यांनी याची संधी साधत त्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. लोखंडी कपाटातून चोरट्यांनी ४० हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाच्या दोन बांगड्या, ४४ हजार रुपये किमतीचे २२ ग्रॅम वजनाची पोत, ३० हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे गोफ, १० हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या, १२ हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे कानातले टोंगल, चार हजार रुपये किमतीचे दोन ग्रॅम वजनाचे ओमपान, दहा हजार रुपये किमतीचे लॅपटॉप व साठ हजार रुपयांची रोकड असा एकूण दोन लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
शुक्रवारी घरी परतल्यावर हा प्रकार उघडकीस आला. घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. विकास बोरसे यांनी शनिवारी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे.