शेळगाव बॅरेजच्या तापी नदीवरील प्रस्तावित पूल व रस्त्यासाठी भूसंपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:15 AM2021-02-07T04:15:55+5:302021-02-07T04:15:55+5:30
जळगाव : तालुक्यातील शेळगाव मध्यम प्रकल्पाच्या तापी नदीवरील प्रस्तावित उंच पूल व पोच रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत असून ...
जळगाव : तालुक्यातील शेळगाव मध्यम प्रकल्पाच्या तापी नदीवरील प्रस्तावित उंच पूल व पोच रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत असून यामध्ये आठ गटांमधील एक हेक्टर ८८ आर एवढ्या जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या भूसंपादनासंदर्भात ६० दिवसांच्या आत हरकती दाखल करता येणार आहे.
तालुक्यातील शेळगाव मध्यम प्रकल्पाचे वाढीव काम प्रस्तावित आहे. यात तापी नदीवर उंच पूल व पोच रस्ता करण्यात येणार आहे. यासाठी भूसंपादन करणे आवश्यक असल्याने जिल्हा प्रशासनाच्यावतीने भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत असून याविषयीची अधिसूचना काढण्यात आली आहे. या भूसंपादनासंदर्भात काही हरकती असल्यास अधिसूचना काढण्यात आल्यापासून ६० दिवसांच्या आत हरकरती सादर करता येणार आहे.
असे होणार भूसंपादन (क्षेत्र -हेक्टर, आरमध्ये)
गट क्रमांक संपादन क्षेत्र
३६३ ०.०२
३६३ ०.०४
३५९ ०.३३
७ ०.२४
८ ०.३१
९ ०.१९
१० ०.७२
११ ०.०५