बहुजन मुक्ती पार्टीचे कंदील भेट आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:20 AM2021-07-07T04:20:43+5:302021-07-07T04:20:43+5:30

जळगाव : शहर बहुजन मुक्ती पार्टीने वीज बिल वाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी सकाळी कंदील भेट आंदोलन केले. तसेच ...

Lantern gift movement of Bahujan Mukti Party | बहुजन मुक्ती पार्टीचे कंदील भेट आंदोलन

बहुजन मुक्ती पार्टीचे कंदील भेट आंदोलन

Next

जळगाव : शहर बहुजन मुक्ती पार्टीने वीज बिल वाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी सकाळी कंदील भेट आंदोलन केले. तसेच अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांना निवेदनदेखील दिले.

यावेळी जिल्हा बहुजन मुक्ती पार्टीचे अध्यक्ष अहमद रंगरेज, जिल्हा कार्याध्यक्ष अलीम शेख, महासचिव विजय सुरवाडे, शहराध्यक्ष इरफान शेख, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अनिता पेंढारकर यांनी हे निवेदन दिले.

यात २०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करावे, मीटर भाड्यात कपात करावी, विजेच्या स्थिर आकारावर प्राथमिक भावाप्रमाणे आकारणी करावी, सक्तीची वसुली थांबवावी, मार्चपासून बिल भरलेले नाही त्यांच्यासाठी अभय योजना राबवा, तसेच ३० दिवसांच्या नंतर रिडिंग घेणाऱ्यावर कारवाई करावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या. यावेळी रियाज पटेल, सुभाष सुरवाडे, सुनील देहडे, सुकलाल पेंढारकर, देवानंद निकम, अजित भालेराव, सुनीता देहडे, सुमित्र अहिरे, इद्रिस शेख, रियाज शेख, संजय सपकाळे, विशाल अहिरराव, दीपाली पेंढारकर, आदित्य देहाडे, मंगेश अडकमोल, सुल्तान शेख उपस्थित होते.

Web Title: Lantern gift movement of Bahujan Mukti Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.