आज कंदील भेट आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:19 AM2021-07-07T04:19:28+5:302021-07-07T04:19:28+5:30
लोकशाहीदिनी ३७ अर्ज दाखल जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित ऑनलाइन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील ...
लोकशाहीदिनी ३७ अर्ज दाखल
जळगाव : जिल्हा प्रशासनातर्फे आयोजित ऑनलाइन लोकशाही दिन जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यात ३७ तक्रार अर्ज दाखल झालेत. यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार भुसावळ कार्यालयाकडे १२, जामनेर-४, रावेर-३, जळगाव- १३, पारोळा-२, यावल-१, अमळनेर-१, पाचोरा यांच्याकडे १ याप्रमाणे एकूण ३७ तक्रार अर्ज प्राप्त झाले.
कारवाईची मागणी
जळगाव : मानव विकास मिशन कार्यक्रमांतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळअंतर्गत कापड पिशवी युनिटमध्ये खरेदी करण्यात आलेल्या साहित्यात घोटाळा झाल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केला आहे. याविषयी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. यासंदर्भात योग्य ती पडताळणी करून पुढील कारवाई करण्याची मागणी गुप्ता यांनी केली आहे.
नवीन कायदा करण्याची मागणी
जळगाव : गेल्या काही वर्षांपासून अनेक राज्यांतून काही समाजकंटकांमार्फत विविध धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असून यासाठी नवीन कायदा करण्याची मागणी सुन्नी ईदगाह ट्रस्टतर्फे करण्यात आली आहे. याविषयी आमदार सुरेश भोळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सुन्नी ईदगाह ट्रस्ट व मरकज सुन्नी जामा मशीदचे अध्यक्ष सय्यद अयाज अली नियाज अली, हाजी मुक्तार शहा, शेख नुरुद्दीन, अफजल मनियार, सय्यद जावेद, मुस्तकीम बहेस्ती, शेख शफी, सय्यद उमर, नाजीम पेंटर, अब्दुल मुस्तकीम, शेख दानिश आदी उपस्थित होते.