मुक्ताईनगर येथे तहसीलदारांना कंदील भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:21 AM2021-07-07T04:21:10+5:302021-07-07T04:21:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुक्ताईनगर : वाढत्या वीज बिलाच्या विरोधात व राज्य सरकारने थकीत वीज बिल माफ करून ...

Lantern gift to tehsildar at Muktainagar | मुक्ताईनगर येथे तहसीलदारांना कंदील भेट

मुक्ताईनगर येथे तहसीलदारांना कंदील भेट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुक्ताईनगर : वाढत्या वीज बिलाच्या विरोधात व राज्य सरकारने थकीत वीज बिल माफ करून नवीन बिल आकारणी योग्यरीत्या करण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी व बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडीतर्फे मंगळवारी येथे अनोखे आंदोलन करण्यात आले. प्रवर्तन चौकापासून आंदोलनाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयात नायब तहसीलदार प्रदीप झांबरे यांना कंदील भेट देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.

२०० युनिटपर्यंत वीज बिल माफ करणे, मीटर भाडे कपात करणे, वीज स्थिर आकार व प्राथमिक भाव याप्रमाणे दर आकारणी करावी, सक्तीची वीज बिल वसुली तात्काळ थांबवावी, ज्या ग्राहकांनी वीज बिल मार्च २०२० पासून भरले त्यांच्यासाठी अभय योजना तयार करावी व पुढील वर्षभरात वीज बिल नील पाठवावे. ३० दिवसांनंतर रीडिंग घेणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशा आशयाच्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

याप्रसंगी बहुजन मुक्ती पार्टी रावेर लोकसभा प्रभारी प्रमोद सौंदळे, तालुकाध्यक्ष बिजलाल इंगळे, विधानसभा प्रभारी राजू वानखेडे, छत्रपती क्रांती सेना तालुकाध्यक्ष राहुल हरणे, बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी तालुकाध्यक्षा संगीता सोनवणे, सिद्धार्थ हिरोळे, अरुण जाधव, पारस हिरोळे, सुपडा हिरोळे, नीलेश वानखेडे, पंचशीला बोदडे, संगीता बोदडे, बेबाबाई सपकाळे, सुरेखा बोदडे सुमनबाई बोदडे, आशा बोदडे, लक्ष्मी बोदडे हे प्रमुख उपस्थित होते.

Web Title: Lantern gift to tehsildar at Muktainagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.