वळणावरच मोठे खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:13 AM2021-05-31T04:13:51+5:302021-05-31T04:13:51+5:30
उपस्थितीबाबत निर्णय होणार जळगाव : जिल्हा परिषदेत सद्या १५ टक्केच कर्मचारी उपस्थितीचे निर्बंध असून येत्या १ जून रोजी याबाबत ...
उपस्थितीबाबत निर्णय होणार
जळगाव : जिल्हा परिषदेत सद्या १५ टक्केच कर्मचारी उपस्थितीचे निर्बंध असून येत्या १ जून रोजी याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांमधील ही उपस्थिती वाढविण्याची शक्यता आहे. गेल्या महिनाभरापासून जि.प.ची कामे रखडत असल्याचे चित्र आहे.
सेवानिवृत्तीचा दिवस
जळगाव : जिल्हा परिषदेतील ९७ कर्मचारी ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. यात सर्वात अधिक ५६ कर्मचारी हे शिक्षण विभागातील असून अन्य विभागातील कमी अधिक, कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. त्यामुळे जि. प. कर्मचाऱ्यांवरील भार वाढणार आहे. यात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी यांचा समावेश आहे.
रुग्ण घटले
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्ण घटले असून या ठिकाणी १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी ३६८ बेडची व्यवस्था असून यातील ६४ बेडचा सीटू कक्ष हा म्यूकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी असून कोविडचे सर्व रुग्ण हे सद्यस्थितीत मुख्य इमारतीत आहेत.