मुक्ताईनगर तालुक्यातील ओझरखेडा तलावात झाला मोठा जलसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 06:06 PM2018-10-27T18:06:25+5:302018-10-27T18:07:57+5:30
भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या ओझरखेडा तलावात यंदा हतनूर धरणाच्या पुराचे पाणी सोडल्याने यंदा प्रथमच २८ दशलक्ष घनमीटर पाणी साचल्याने समाधान व्यक्त होत आहे.
हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड या तीन तालुक्यांसाठी वरदान ठरू पाहणाऱ्या ओझरखेडा तलावात यंदा हतनूर धरणाच्या पुराचे पाणी सोडल्याने यंदा प्रथमच २८ दशलक्ष घनमीटर पाणी साचल्याने समाधान व्यक्त होत आहे. लांबवर का होईना वन्यजीव प्राण्यांना दिलासा मिळाला आहे.
बहुप्रतीक्षेनंतर यंदा २५ टक्के हतनूर धरणातील जुलै, आॅगस्टमधील काही क्षमतेने पुराचे पाणी उचलून तलावात टाकण्यात आले. त्याचे संमाधान व शेतकºयांना दिलासा मिळाला आहे. नुकतीच शासकीय स्तरावर पहाणी करण्यात आली. भुसावळ तालुक्यातील वरणगाव-तळवेल परिसर सिंचन योजना या नावाने हा प्रकल्प आहे.
नैसर्गिक पावसाने पाच ते सात टक्के जलसाठा येथे उन्हाळ्यात शिल्लक राहात असे. यंदा प्रथमच त्याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. दरवर्षी अल्प साठा असताना या तलावाच्या कामाला दोन दशके पूर्ण झाले होते. यंदाही तलावात पाणी पडेल किंवा नाही याची शेतकºयांना शंका होती. त्यातच यंदा कमी पावसामुळे तलावात पाणी साचने कठीण होते. तलावात पाणी पडल्याचे समाधान व्यक्त होत आहे. परिसरातील कूपनलिका व विहिरींनाही जल श्रोत वाढीसाठी महत्त्वाचे आहे. तलावाचे कामे सुरू आहे.
यंदा २८ दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे. दरवर्षी २५ टक्के धरणाचे पाणी तलावात साठवले जाणार आहे. इतर कामे प्रगती पथावर आहेत. पाईपलाईनद्वारे शेतीसाठी पाणी प्रस्तावित आहे. पूर्ण क्षमतेने तलाव भरल्यास १६,९४८ हेक्टर जमिनीला फायदा होईल.
-मनोज ढोकचौळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग