वराड बुद्रूक येथे पोषण आहारात निघाल्या अळ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 11:45 PM2019-03-06T23:45:14+5:302019-03-06T23:45:26+5:30
धरणगाव - तालुक्यातील वराड बु. येथील अंगणवाडीमध्ये बुधवारी सकाळी पोषण आहारात अळ्या आढळून आल्या. हा आहार खाल्याने मुलांना उलट्यादेखील ...
धरणगाव - तालुक्यातील वराड बु. येथील अंगणवाडीमध्ये बुधवारी सकाळी पोषण आहारात अळ्या आढळून आल्या. हा आहार खाल्याने मुलांना उलट्यादेखील झाल्या. पोषण आहारात अळ््या निघाल्यानंतर अंगणवाडीसेविका व मदतनीस यांनी तो मुलांना दिला आणि घरी डब्यातदेखील दिला. मुलांनी घरी डबे आणल्यानंतर ही बाब काही पालकांच्या लक्षात आली. त्यांनी अंगणवाडीमध्ये धाव घेतली व तेथे ही बाब लक्षात आणून दिली. अंगणवाडी सेविका रमणबाई इसाने व मदतनीस सुनिता बियाणी यांनी झालेली चूक मान्य तर केली मात्र त्यांंनी पालकांशी वाद घातल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या ठिकाणी पालक, सरपंच अभिमन पाटील, पोलीस पाटील राजू वनाजी वाडले आदी पोहोचले. त्यांनी अळ्यायुक्त पोषण आहार स्वत: पाहिला व त्यांचे छायाचित्रही घेतले. त्यानंतर गट विकास अधिकारी एस.डी. जाधव यांना या विषयी माहिती देण्यात आली. त्यांनी चौकशीसाठी अंगडवाडी पर्यवेक्षिका सोनाली देसाई व रेखा तायडे पाठविले. त्यांनी आहाराचे नमुने व सेविका आणि मदतनीस यांचे जबाब घेऊन पंचनामा केला. दोषींवर कारवाईची मागणी पालक करीत आहेत. दरम्यान, या बाबत गटविकास अधिकारी एस.डी.जाधव यांनीही या प्रकारास दुजोरा दिला असून माझ्याकडे तक्रार येताच अंगडवाडी पर्यवेक्षिकांना चौकशीसाठी पाठविले होते. उद्या स्वत: बालविकास प्रकल्प अधिकारी धनगर यांना पाठवून सत्यता जाणून घेवू. या संदर्भात अंगणवाडी सेविकांना नोटीस बजावणार असल्याचेही जाधव यांनी सांगितले.