पाचोरा तालुक्यातील लासुरे जि.प. शाळेला आदर्श शाळा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 07:37 PM2019-03-04T19:37:21+5:302019-03-04T19:38:19+5:30
पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नुकताच महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीमार्फत दिला जाणारा जळगाव जिल्हा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
वरखेडी, ता.पाचोरा, जि.जळगाव : पाचोरा तालुक्यातील लासुरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला नुकताच महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीमार्फत दिला जाणारा जळगाव जिल्हा राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. औरंगाबाद येथे झालेल्या कार्यक्रमात विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारासाठी निवड झालेली ही जळगाव जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधन सुविधेसोबत भौतिक सुविधा उपलब्ध असाव्यात यासाठी मुख्याध्यापक योगेश तागड, रणजीत परदेशी, प्रवीण पाटील, माजी मुख्याध्यापिका उज्वला परदेशी व अरुणा उदावंत या शिक्षकांनी प्रयत्न केले. शाळेला हे यश प्राप्त झाल्याबद्दल सरपंच सुरेखा देवरे, माजी सरपंच सुदाम देवरे, ग्रामपंचायत सदस्य अॅड.दिनकर देवरे, मनोहर देवरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील देवरे, रवींद्र पाटील आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमात आदर्श शिक्षिका म्हणून उज्वला परदेशी (हल्ली वरखेडी शाळा), अरुणा उदावंत (हल्ली राजुरी शाळा) यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच योगेश तागड, रणजीत परदेशी यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आले.