तब्बल 11 वर्षापासून फ्रॅंकिंग मशिनमध्ये अडकले पावणे सात कोटी रुपये

By Admin | Published: April 21, 2017 04:20 PM2017-04-21T16:20:11+5:302017-04-21T16:20:11+5:30

अमळनेर दुय्यम निबंधक कार्यालयातील फ्रॅंकिंग मशीन तब्बल 11 वर्षापासून बंद पडल्याने सहा कोटी 67 लाख 89 हजार 815 अडकून पडले आहेत.

For the last 11 years, the franking machine has been stuck in seven crore rupees | तब्बल 11 वर्षापासून फ्रॅंकिंग मशिनमध्ये अडकले पावणे सात कोटी रुपये

तब्बल 11 वर्षापासून फ्रॅंकिंग मशिनमध्ये अडकले पावणे सात कोटी रुपये

googlenewsNext

 ऑनलाईन लोकमत विशेष /संजय पाटील  

अमळनेर, दि.21 - येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील फ्रॅंकिंग मशीन तब्बल 11 वर्षापासून बंद पडल्याने सहा कोटी 67 लाख 89 हजार 815 अडकून पडले आहेत. मात्र याबाबत वरिष्ठ अधिकारी अनभिज्ञ आहे.
तेलगीचा बनावट मुद्रांक घोटाळा उघडकीस आल्यानंतर शासनाने फसवणूक व शासनाची लूट थांबण्यासाठी ऑनलाईन मुद्रांक पद्धत म्हणजे फ्रॅंकिंग मशीन चा वापर सुरु केला होता. 2003 मध्ये अमळनेर दुय्यम निबंधक कार्यालयात फ्रॅंकिंग मशीन दिले होते.  पुणे येथील खाजगी कंपनीतर्फे स्टेशनरी आणि सेवा सहित हे मशीन पुरवण्यात आले होते. शासनाने देखील कोटय़वधी रुपये  या मशीनद्वारे डिजिटल पद्धतीने पुरविले होते. त्यानंतर खरेदी विक्री व्यवहारातून मुद्रांक स्वरूपात ते कापले जात होते . 2006 र्पयत मशीन सुरळीत सुरू होते. मुद्रांकाच्या तुटवडय़ावेळी या मशिनची मदत होत होती. 2006 मध्ये मशीन खराब झाले वेळोवेळी दुरुस्तीची मागणी करूनही दुरुस्त झाले नाही. दरम्यानच्या काळात फ्रॅंकिंगद्वारे ही फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने शासनाने पाच हजार रुपयांपेक्षा पेक्षा जास्त मुद्रांक किमतीचे व्यवहार या द्वारे करू नये असे निर्देश दिले. अमळनेर कार्यालयात दरम्यानच्या काळात 3 ते 4 अधिकारी बदलून गेल्याने फ्रॅंकिंग मशीन धूळ खात पडून आहे. त्यातील 6 कोटी 67 लाख 89 हजार 815 रुपयांची रक्कम तशीच अडकून पडली आहे. या रकमेचा वापरच न झाल्याने शासनाचे नुकसान झाले आहे. 
याबाबत दुय्यम निबंधक कुमार मावळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अमळनेर येथे आपली आताच नियुक्ती झाल्याचे सांगितले. फ्रॅंकिंग मशिनबाबत पत्रव्यवहार काय झाला याची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले
जिल्ह्यात माझी नवीन नियुक्ती झाली आहे. फ्रॅंकिंग मशिनमध्ये अडकलेल्या रकमेची माहिती घेऊन तिचा विनियोग कसा करता येईल याची माहिती देण्यात येईल असे प्रशासकीय अधिकारी (स्टॅम्प कलेक्टर) अशोक पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले.

Web Title: For the last 11 years, the franking machine has been stuck in seven crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.