मेहरूण तलावाच्या गणेश घाटाचे काम अंतीम टप्प्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2017 12:23 AM2017-01-12T00:23:21+5:302017-01-12T00:23:21+5:30
जळगाव : मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून गणेश घाटाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे सुमारे 95 लाख रुपये खर्चाचे काम मार्च 2017 अखेर्पयत पूर्ण करण्याची मुदत आहे
जळगाव : मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणाचा एक भाग म्हणून गणेश घाटाचे काम अंतिम टप्प्यात आले असून हे सुमारे 95 लाख रुपये खर्चाचे काम मार्च 2017 अखेर्पयत पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र आठ-पंधरा दिवसात हे काम मक्तेदाराकडून पूर्ण केले जाण्याची शक्यता आहे. या घाटामुळे मेहरुण तलावाच्या तसेच शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
गणेशघाटाच्या कामात मेहरूण तलावाच्या काठावर 25 मीटर लांब व 50 मीटर रूंद काँक्रीटचा घाट तयार करण्यात आला आहे. त्यात 1 मीटरमध्ये पाय:यांचे 25 टप्पे करण्यात आले असून संपूर्ण काँक्रीटने हे काम करण्यात आले आहे. तर त्यावर लाल रंगातील जयपुरी दगड बसवून सुशोभिकरण केले जात आहे. त्यातील केवळ शेवटच्या टप्प्याचे (पायरीचे) काम बाकी होते. ते सध्या सुरू आहे.
पाय:यांवर मोठय़ा प्रमाणात घाण
तलावात कचरा टाकण्याचे प्रकार मात्र सुरूच आहेत. त्याची सफाईदेखील होत नाही. गणेश घाटाच्या पूर्ण झालेल्या पाय:यांवर देखील मोठय़ा प्रमाणात घाण पडलेली असते.
त्यामुळे या गणेश घाटावर नियमितपणे सफाई केली जाण्याची आवश्यकता आहे.
बाक बसविण्यास सुरुवात
घाटाच्या या पाय:यांपासून रस्त्यार्पयत व मंदिरार्पयतच्या भागात काँक्रीटीकरण करण्याचे काम पूर्ण झाले आहे. नागरिकांना बसण्यासाठी बाक बसविणे, गुरांना अडथळा करण्यासाठी बॅरिकेटींग करणे आदी कामे बाकी आहेत. तलावाच्या मुख्य बांधाच्या कोप:यावर चौथरा करून त्यास बॅरीकेटींगचे काम करण्यात आले असून त्या चौथ:यावर सिमेंटचे बाक बसविण्याचे काम सध्या सुरू आहे.