जळगावात गणेश मूर्ती घडविण्याची कामे अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 02:54 PM2018-09-06T14:54:24+5:302018-09-06T14:57:48+5:30

शहरातील अजिंठा रोडवर यावर्षीही या ठिकाणी काही मूर्तिकारांनी आपले बस्तान मांडले आहे. स्थानिक मूर्तिकारांसह राजस्थानातून काही कुटुंबीय या ठिकाणी आले असून विविध मूर्ती बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.

In the last phase of the work of making Ganesh idol in Jalgaon | जळगावात गणेश मूर्ती घडविण्याची कामे अंतिम टप्प्यात

जळगावात गणेश मूर्ती घडविण्याची कामे अंतिम टप्प्यात

Next
ठळक मुद्देमूर्तिकारांकडून रात्रीचा दिवसस्थानिकांसह बंगाली व राजस्थानी बांधवांकडून जोरदार तयारीलालबागच्या राजाला मागणी

जळगाव : शहरातील अजिंठा रोडवर यावर्षीही या ठिकाणी काही मूर्तिकारांनी आपले बस्तान मांडले आहे. स्थानिक मूर्तिकारांसह राजस्थानातून काही कुटुंबीय या ठिकाणी आले असून विविध मूर्ती बनविण्याचे काम आता अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
आठ दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे मूर्तिकार हे मूर्ती घडविण्याच्या कामात दिवसरात्र काम करीत आहे. यामुळे आता घरी जाणे बंदच असल्याचे स्थानिक मूर्तिकार देवीदास राठोड यांनी सांगितले.
लालबागच्या राजाला मागणी
सुमारे सात ते आठ फूट उंच असलेल्या लालबागच्या राजाच्या मूर्तीला मंडळांची पसंती असल्याचे हे व्यावसायिक सांगतात. यासह शिवशंकरासह मूर्ती, दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिकृती अशा विविध प्रकारच्या मूर्ती या ठिकाणी साकारण्यात आल्या आहेत.
आकर्षक रंगसंगतीच्या या मूर्ती मन प्रसन्न करतात. आता बहुतांश कामे पूर्ण झाली असून शहरातील गणेश मंडळांचे कार्यकर्ते मूर्तीच्या नोंदणीसाठी येथे येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील भुसावळ, वरणगाव, धरणगावसह जळगाव शहरातील विविध भागातील मंडळांचे कार्यकर्ते येथे येऊन मूर्ती नोंदणी करून गेल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.
८० टक्के नागरिकांची
शाडू मातीच्या गणपतीला पसंती -घाणेकर
पर्यावरण हा विषय आता बहुसंख्य व्यक्ती गांभीर्याने घेतात. खरेदीस आलेल्या ८० टक्के व्यक्तींची शाडू मातीच्या गणपतीला मागणी असते, अशी माहिती ५० वर्षांपासून या व्यवसायात असलेले दीपक घाणेकर यांनी दिली. वडील गजानन त्र्यंबक घाणेकर व आता ते स्वत: हा व्यवसाय सांभाळून आहे.
पेण व कोल्हापूर येथून त्यांच्याकडे गणपती मूर्ती आणल्या जातात. या काळात एक हजार ते १२०० मूर्तींची विक्री त्यांच्याकडून केली जाते. दरम्यान ज्या व्यक्ती वर्षभर गणपतीची मूर्ती घरात ठेवतात तेच फक्त प्लॅस्टर आॅफ पॅरिसची मूर्ती खरेदी करतात.
यंदा थर्माकोलची मंदिर विक्रीला बंदी आहे. त्यामुळे फायबरपासून बनविलेल्या मंदिरात लाईटिंग सोडलेली व आत मूर्ती असा अनोखा संगम असलेल्या मूर्तींना जास्त मागणी असल्याचे दीपक घाणेकर यांनी सांगितले.
तसेच बैलगाडीवरील गणपती, लालबागचा राजा, दगडू शेठ हलवाई मंदिरातील मूर्तीची प्रतिकृती अशा मूर्तींनाही मागणी आहे.

Web Title: In the last phase of the work of making Ganesh idol in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.