अखेर तो खड्डा बुजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:13 AM2021-05-29T04:13:39+5:302021-05-29T04:13:39+5:30

जळगाव : अजिंठा चौफुलीवर अगदी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या अपघाताची भीती होती. अनेक दिवसांपासून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत ...

At last the pit was filled | अखेर तो खड्डा बुजला

अखेर तो खड्डा बुजला

Next

जळगाव : अजिंठा चौफुलीवर अगदी रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे मोठ्या अपघाताची भीती होती. अनेक दिवसांपासून याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत होते. अखेर तात्पुरत्या स्वरूपात हा खड्डा बुजण्यात आला आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

बेड मॅनेजमेंटला दिलासा

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आता रुग्णसंख्या घटत असून, अनेक बेड रिक्त आहेत. अशा स्थितीत बेड मॅनेजमेंटमध्ये येणारे कॉलही अगदी कमी झाले असून, या यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या महिन्यात बेडच्या परिस्थितीबाबत विचारणा करणारे शेकडो कॉल या ठिकाणी धडकत होते.

रुग्णांना फळांचा ज्यूस

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांना प्रतिकारक्षमता वाढविणारे फळांचे ज्यूस दिले जात आहेत. रुग्णालयाच्या कन्टीनमध्ये हे ज्यूस बनविले जातात. गुरुवारी रुग्णांना बिटचा रस देण्यात आला होता. रुग्णांना सकस व पौष्टिक आहार मिळावा, यासाठी याठिकाणी एक समितीच नियुक्त करण्यात आली आहे.

Web Title: At last the pit was filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.