भुसावळ तालुक्यात अखेर ज्वारी-मका खरेदी केंद्राचे काटा पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:16 PM2018-12-14T23:16:31+5:302018-12-14T23:18:56+5:30
भुसावळ येथील शासकीय गोदामामध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असल्यामुळे ज्वारी व मका खरेदी खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असला, तरी नोंदणी झालेली सर्व ज्वारी व मका पूर्णपणे मोजून घ्यावी, अशी सूचना आमदार संजय सावकारे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व शेतकी संघ यांना केली आहे. जामनेर रोडवरील कुºहे (पानाचे)-चोरवड दरम्यान खासगी गोदामांमध्ये आमदार सावकारे यांच्या हस्ते शुक्रवारी काटा पूजन करण्यात आले.
भुसावळ, जि.जळगाव : येथील शासकीय गोदामामध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले असल्यामुळे ज्वारी व मका खरेदी खरेदी केंद्र सुरू करण्यास विलंब होत असला, तरी नोंदणी झालेली सर्व ज्वारी व मका पूर्णपणे मोजून घ्यावी, अशी सूचना आमदार संजय सावकारे यांनी तहसीलदार भाऊसाहेब थोरात व शेतकी संघ यांना केली आहे.
जामनेर रोडवरील कुºहे (पानाचे)-चोरवड दरम्यान खासगी गोदामांमध्ये आमदार सावकारे यांच्या हस्ते शुक्रवारी काटा पूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी अॅड. रवींद्र पाटील हे होते, तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार भाऊसाहेब थोरात, शेतकी संघाचे सभापती पंढरीनाथ पाटील, उपसभापती गोविंदा ढोले, सामाजिक न्याय विभागाचे मानकरी, गजानन सरोदे, होमा पाचपांडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू जोशी, नारायण सपकाळे, प्रशांत निकम, अशोक पाटील, अशोक सरोदे, एस.आर.पाटील, श्रीधर महाजन, सुरेश येवले , कुºहे (पानाचे) येथील ग्रामपंचायतीचे सदस्य नाना पवार, माजी सदस्य सुभाष पाटील, किशोर वराडे, विलास देवकर, कैलास गव्हाणे, शेतकी संघाचे व्यवस्थापक विजय झोपे, ग्रेडर बोंडे, चोरवड येथील पांडुरंग पाटील आदी उपस्थित होते.
खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळावी -अॅड. पाटील
ज्वारी व मका नोंदणी व खरेदी करण्यासाठी अवघे १५ दिवस राहिले आहे, तर आतापर्यंत ३०० शेतकºयांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे कमी काळात शेतकºयांना नोंदणी व खरेदीसाठी वेळ देण्यात यावा. खरेदीसाठी पुन्हा मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पणन महासंघाचे संचालक अॅड.रवींद्र पाटील यांनी केली आहे व मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवा, अशी सूचना आमदार सावकारे यांना केली.
दरम्यान, खरेदी केंद्र सुरू होण्यास खूपच उशीर झाला आहे. आता अवघे १५ दिवस खरेदी व नोंदणीसाठी उरले आहे. त्यामुळे खरेदी केंद्रास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पणन महासंघाचे संचालक एडवोकेट रवींद्र पाटील यांनी केली आहे. पाटील यांच्या मागणीचा विचार करूनच आमदार सावकारे यांनी मुदतवाढीसाठी तहसीलदारांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत.
मुदतवाढीची वाट न पाहता तीन काटे लावून खरेदी करावी
दरम्यान, ज्वारी व मका खरेदी केंद्र काटा पूजन करण्यात आले असले, तरी खरेदीस मात्र सोमवार १७ पासून प्रारंभ करण्यात येऊ शकतो. त्यामुळे खरेदी करण्यासाठी अवघे १४ दिवस मिळणार आहे. त्यात आतापर्यंत ३०० शेतकºयांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे संघाने मुदतवाढीची वाट न पाहता तीन ते चार वजन काटे लावून व कर्मचाºयांमध्ये वाढ करून ज्वारी व मका लवकरात लवकर करावा, अशी मागणी शेतकरीवर्गातूून करण्यात आली आहे.