उशिरा वेतन देयक देणा:या जळगाव जिल्ह्यातील 82 शाळांना नोटीस
By admin | Published: May 23, 2017 12:58 PM2017-05-23T12:58:28+5:302017-05-23T12:58:28+5:30
शिक्षणाधिका:यांची कारवाइ. आठवडाभरात खुलासा मागविला
Next
ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.23- सर्व माध्यमिक शाळांना शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा:यांचे दर महिन्याचे वेतन नियमित देयक महिन्याचा 1 ते 7 तारखेर्पयत अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे पाठविणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक शाळा शिक्षकांच्या वेतन देयकांची माहिती उशिराने पाठवित असल्याने शिक्षकांचे वेतन उशिराने होत आहे. यामुळे शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी उशिराने वेतन देयक पाठविणा:या जिल्ह्यातील 82 शाळांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
वेतन बिले वेळेवर पाठविण्यात येत नसल्याने शिक्षकांचे वेतन 1 तारखेला होत नाही. पंधरा-पंधरा दिवस उशिराने होत आहेत. यामुळे शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी, विम्याचे हप्ते भरण्यास विलंब होतो. तसेच वेतन वेळेवर होत नसल्याने विविध अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात आले. मुख्याध्यापकांच्या दुर्लक्षामुळे शिक्षकांना अडचणी येत असल्याने अनेक शिक्षकांकडून याबाबत शिक्षण विभागाकडे यापूर्वी तक्रारी दाखल केल्या होत्या.