चाळीसगावात विद्यार्थ्यांना मोफत पास वाटपाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 05:06 PM2018-11-17T17:06:43+5:302018-11-17T17:08:01+5:30
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना एसटी मोफत पास वितरणाचा शुभारंभ शनिवारी दुपारी चाळीसगाव बसस्थानकात झाला.
चाळीसगाव, जि.जळगाव : परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या आदेशानुसार दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना एसटी मोफत पास वितरणाचा शुभारंभ शनिवारी दुपारी चाळीसगाव बसस्थानकात झाला. यासाठी पप्पू गुंजाळ प्रतिष्ठानने पाठपुरावा केला होता. याचा फायदा ग्रामीण भागातील सहा हजार विद्यार्थ्यांना होणार असून, शनिवारी ३०० विद्यार्थ्यांना मोफत पास दिले गेले.
शासनाने जाहीर केल्यानुसार चाळीसगाव तालुक्याचा समावेश गंभीर दुष्काळ यादीत आहे. तालुक्यांतील तांत्रिक, व्यावसायिक, महाविद्यालयीन, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातून शहरात ये - जा करता यावे म्हणून मोफत मासिक सवलत पास योजना जाहीर केली आहे.
शनिवारी या योजनेचा शुभारंभ विद्यार्थी योगीता सतीश पगडे, सतीश शिवाजी राठोड यांना मोफत पासेस देऊन झाला. या वेळी पप्पू गुंजाळ, सामाजिक प्रतिष्ठानचे राहुल पाटील, सचिन फुलवारी यांच्यासह आगारप्रमुख सुनील निकम यांच्या हस्ते पासेस वितरण झाले. एपीआय सोनटक्के, मनोज भोई, व्ही.आर.वाघ, सुभाष खरटमल, अरुण पिंगळे, मनीष सैंदाणे, रोशन चव्हाण, विनोद चव्हाण, राहुल म्हस्के, धीरज पवार, अजय चौधरी, चेतन कुमावत, शुभम पाटील, जितेंद्र पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.