मेहरूण तलावाच्या गणेश घाटाचे लोकार्पण

By admin | Published: February 26, 2017 12:43 AM2017-02-26T00:43:22+5:302017-02-26T00:43:22+5:30

जळगाव : मेहरूण तलावावर तयार करण्यात आलेल्या गणेश घाटाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

Launch of Ganesh Ghat of Mehrun Lake | मेहरूण तलावाच्या गणेश घाटाचे लोकार्पण

मेहरूण तलावाच्या गणेश घाटाचे लोकार्पण

Next

जळगाव : मेहरूण तलावावर तयार करण्यात आलेल्या गणेश घाटाचे लोकार्पण व गाळ काढल्यानंतर तुडंब भरलेल्या पाण्याचे जलपूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील  यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.
मेहरूण तलावावर गणेश घाटाचा लोकार्पण सोहळा महापालिकेतर्फे आयोजिण्यात आला होता. लोकार्पण सोहळ्याच्या कोनशिलेचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रारंभी झाले. यानंतर जलपूजनाचा कार्यक्रम झाला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत व लोकसहभागातून या तलावाचे खोलीकरण करण्यात आले. तलावावर केलेल्या सुशोभिकरणाची  पालकमंत्र्यांनी माहिती घेऊन पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार ए.टी. पाटील, महापौर नितीन लढ्ढा, आमदार किशोर पाटील, आमदार उन्मेष पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, आमदार चंदुलाल पटेल,  उपमहापौर ललित कोल्हे, स्थायी समितीच्या सभापती वर्षा खडके, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, महापालिका आयुक्त जीवन सोनवणे, नितीन बरडे  यांच्यासह      मनपातील  नगरसेवक उपस्थित होते. 
देशमुख यांची नाराजी
कार्यक्रमाच्या वेळेतील बदलाबाबत मनपातून नगरसेवकांना वेगवेगळे निरोप दिले जात होते. त्यामुळे दोन वेळा कार्यक्रम स्थळी येऊनही दुपारी तो न झाल्याने नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी मनपा कर्मचाºयांना फैलावर घेतले.

Web Title: Launch of Ganesh Ghat of Mehrun Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.