म्हसावद येथे शासकीय धान्य खरेदी केंद्राचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2020 04:11 AM2020-12-07T04:11:07+5:302020-12-07T04:11:07+5:30
यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, शेतकी संघाचे अध्यक्ष अजाबराव पाटील, उपाध्यक्ष रवी कापडणे, संचालक विजय ...
यावेळी तहसीलदार नामदेव पाटील, बाजार समिती सभापती कैलास चौधरी, शेतकी संघाचे अध्यक्ष अजाबराव पाटील, उपाध्यक्ष रवी कापडणे, संचालक विजय सोनवणे, संस्थेचे व्यवस्थापक दीपक पाटील यांच्यासह रमेश पाटील, अर्जुन पाटील, समाधान चिंचोरे, निंबा ठाकरे, मधुकर पाटील, भगवान पाटील, सुभाष लंगरेस, पी. के.पाटील, किशोर चौधरी, विजय आमले, किशोर चिंचोरे, नारायण चव्हाण, जगदीश गुरव, एकनाथ पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
जळगाव तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघातर्फे खरीप पणन हंगाम अंतर्गत आधारभूत केंद्र व राज्यशासनाच्या निर्णयानुसार म्हसावद येथे ज्वारी बाजरी, मका खरेदीस सुरुवात झाली आहे. यावेळी किशोर चौधरी यांच्या हस्ते गोडाऊनमध्ये काटा पूजनही करण्यात आले.
या खरेदी केंद्रावर मका १ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल, ज्वारी २ हजार ६२० रूपये तर बाजरी २ हजार १५० रुपये प्रतिक्विंटल या भावाने आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ही योजना सुरु राहणार आहे.