राष्ट्रवादीच्या युवक जोडो संपर्क अभियानाचा अमळनेरातून प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:13 AM2021-06-28T04:13:38+5:302021-06-28T04:13:38+5:30
या अभियानाचा मूळ उद्देश म्हणजे आजवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताकाळात केलेली लोकोपयोगी कामे व घेतलेले लोकहिताचे निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे ...
या अभियानाचा मूळ उद्देश म्हणजे आजवर राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताकाळात केलेली लोकोपयोगी कामे व घेतलेले लोकहिताचे निर्णय सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे व जास्तीत जास्त युवकांना पक्षाशी एकरूप करणं हे असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. ‘वन बूथ, टेन यूथ’ या संकल्पनेवर जास्तीत जास्त भर देण्याचं आवाहन करत लवकरात लवकर तालुका युवक पदाधिकाऱ्यांनी बूथ कमिट्या तयार करून कार्यकारिणी जिल्ह्याकडे सुपुर्द कराव्यात. यासोबतच युवकांनी आता यापुढील काळात आक्रमकरीत्या आपली वाटचाल ठेवून निवडणुका लढवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकीला जिल्ह्याचे युवक कार्याध्यक्ष दीपक पाटील, तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निरीक्षक राज कोळी, तालुकाध्यक्ष सचिन पाटील, प्रा. सुरेश पाटील, विनोद सोनवणे, नीलेश देशमुख, विनोद कदम, अंकुश भागवत, गौरव पाटील, मुख्तार खाटीक, निनाद शिसोदे, गोविंदा बावस्कर, पंकज पाटील, प्रदीप पाटील, शुभम पाटील, अमोल पाटील उपस्थित होते.
यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकारी- शिरीष पांडुरंग पाटील, प्रशांत रमेश पाटील व शरद रामचंद्र पाटील तालुका उपाध्यक्ष, प्रणव पाटील कार्याध्यक्ष, चिंधा मालचे, मयूर पाटील तालुका सचिव, भूषण पाटील व गोविंदा सोनवणे सरचिटणीस.