ग्रामीण ई-गृहप्रवेश अभियानाचा शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:11 AM2021-06-18T04:11:55+5:302021-06-18T04:11:55+5:30
यावल : महाआवास अभियान अंतर्गत ग्रामीण पातळीवरील ई-गृहप्रवेश कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात झाला. ...
यावल : महाआवास अभियान अंतर्गत ग्रामीण पातळीवरील ई-गृहप्रवेश कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात झाला.
ग्रामीण गृहनिर्माणला चालना देण्यासाठी ग्रामविकास विभागामार्फत पुढील १०० दिवसात राबवण्यात येणाऱ्या महाआवास अभियानाचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
ग्रामीण भागात ‘महाआवास’ अभियानातून घरकूल आवास अभियान- ग्रामीण’ अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रमाई आवास, प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण, शबरी आवास योजना अशा विविध घरकूल योजनांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांनी येत्या १०० दिवसात १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. ‘महाआवास’ अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण घरकूल निर्मितीला गती द्यावी आणि आपल्या क्षेत्रातील विभागाला प्रथम क्रमांकावर आणावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तालुक्यातील स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना केले.
याप्रसंगी यावल पंचायत समितीच्या सभापती पल्लवी पुरूजित चौधरी, यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. नीलेश पाटील, राज्य परिषद संघाचे जिल्हा अध्यक्ष सरपंच पुरोजित चौधरी, अझरुद्दिन फारुकी, ग्रामीण गृहअभियंता किरण सपकाळ, घरकूल विभागाचे संगणक संचालक मिलिंद कुरकुरे, जावेद तडवी, अक्षय शिरसाळे, रौनक तडवी आदी उपस्थित होते.