जळके येथे जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरन कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:10 PM2018-01-11T12:10:07+5:302018-01-11T12:15:40+5:30

राज्यात पहिला मान जळके गावाल

Launch of work water tank at Jalke | जळके येथे जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरन कामाचा शुभारंभ

जळके येथे जलयुक्त शिवार अंतर्गत नाला खोलीकरन कामाचा शुभारंभ

Next
ठळक मुद्देजलसंधारण सचिव एकनाथ डवले यांची विशेष उपस्थिति  जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत 222 गावांची निवड

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 11-  तालुक्यातील जळके येथे या वर्षाच्या जलयुक्त शिवार अभियान टप्पा क्र. 3 अंतर्गत नाला खोलीकरन कामाचा शुभारंभ सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील व जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांच्याहस्ते 11 जानेवारी  रोजी झाला. 
जळगाव जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत 222 गावांची निवड करण्यात आलेली असून त्या पैकी जळगाव तालुक्यात 12 गावांसाठी 171 कामांचा समावेश आहे. तालुक्यात  सदर कामांसाठी 2 कोटी 68 लाख एवढा निधि मंजूर आहे. जलके या गावात सुमारे 28 लाखाच्या 20 कामांचा समावेश आहे. जिल्ह्यात जलयुक्त कामाचा शुभारंभाचा मान जळगाव ग्रामीण मतदार संघातील जळके या गावाला मिळाला आहे. विशेष म्हणजे राज्यात प्रथमच जलसंधारण सचिव एकनाथ डवले यांच्या खास उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे.
 सदर कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, माजी सरपंच रमेश जगन्नाथ पाटील, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील, विकासोचे सदस्य पी.के. पाटील आदी उपस्थित होते. 

Web Title: Launch of work water tank at Jalke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.