बाहेरील लाईट काढून वकीलाकडे घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:56 PM2019-07-13T12:56:06+5:302019-07-13T12:56:35+5:30

संभाजीनगरात सलग दुसरी घटना

The lawmaker takes away the light outside the house | बाहेरील लाईट काढून वकीलाकडे घरफोडी

बाहेरील लाईट काढून वकीलाकडे घरफोडी

Next

जळगाव : बंगल्याच्या आवारात सुरु असलेल्या लाईट काढून तो कुंडीत ठेवून चोरट्यांनी संभाजी नगरात वकीलाचे घर फोडून ५५ हजाराचा ऐवज लांबविल्याची घटना गुरुवारी रात्री ११ वाजता उघडकीस आली. दरम्यान, चोरट्यांनी बंगल्यात चॉकलेटचा आस्वाद घेतानाच पान व गुटखा खाऊन ठिकठिकाणी पिचकाऱ्या मारल्या आहेत.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, अ‍ॅड.श्यामसुंदर हरी सपकाळे यांचा संभाजी नगरातील गट क्र.४४८/१ व प्लॉट क्र.४८/ १ मध्ये बहिणाबाई नावाचा बंगला आहे. तेथे वडील अ‍ॅड. हरी दयाराम सपकाळे, आई मंगला, पत्नी पारुल व मुलगी स्वरा यांच्यासह वास्तव्याला आहेत. लहान भाऊ शंतनू मुंबईतील मुलुंड येथे एम.एस.आर्थोचे शिक्षण घेत असल्याने संपूर्ण कुटुंब ३ जुलैपासून त्यांच्याकडे गेले होते. गुरुवारी रात्री ११ वाजता ते कारने जळगावातील घरी परतले असता मुख्य दरवाजाचे लोखंडीचे गेटचे कुलुप तुटलेले होते तर आतील सर्वच दरवाजाचे कुलुप व कडीकोयंडा तुटलेले होते. घरातील साहित्याचीही नासधूस झालेली असल्याने चोरी झाल्याचा अंदाज आला.
वडील निवृत्त सचिव
अ‍ॅड.श्यामसुंदर सपकाळे यांचे वडील अ‍ॅड. हरी सपकाळे हे मंत्रालयात विधी व न्याय विभागात उपसचिव होते. २०१३ मध्ये ते निवृत्त झाले. दरम्यान, १२ वर्षापासून बंगल्याला कुलुप असताना कधीच चोरी झाली नाही, आता रहिवासासाठी आल्यानंतर आठच दिवस बाहेर गावी गेलो आणि चोरीचा प्रकार घडला. दरम्यान, संभाजी नगरात बुधवारी देखील प्राध्यापकाकडे चोरी झाली होती. त्याच दिवशी ही चोरी झाल्याची शक्यता आहे.
कपाटातील दागिने रोकड लांबविली
दोन्ही बेडरुमधील कपाट उघडे होते. लॉकरच्या चाव्या शेजारील कपाटातून काढून चोरट्यांनी अर्धा तोळे सोन्याचे कर्णफुले, दहा हजार रुपये रोख व ३० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने, चमचे, वाट्या व ग्लास असा एकूण ५५ हजार रुपयांचा ऐवज लांबविण्यात आल्याचे अ‍ॅड.सपकाळे यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, घरात एका टोपलीत चॉकलेट आढळून आले. बेसीन तसेच भिंतीला लागून पान व गुटख्याचे थुंकलेले होते. घरात सर्वत्र अस्वच्छता होती. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अ‍ॅड.सपकाळे यांनी रात्रीच रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. दीड वाजता पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. सकाळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञांनी भेट दिली.

Web Title: The lawmaker takes away the light outside the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव