एलसीबीकडून तोंडापूरात दारुचे दहा खोके जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 07:02 PM2019-07-14T19:02:49+5:302019-07-14T19:03:25+5:30
पोलीस अधिक्षकांच्या आदेशाने पहूर येथील दोन पोलीस कर्मचारी मुख्यालयात जमा
पहूर ता जामनेर:- स्थानिक गुन्हेशाखेच्या रडारवर भारुडखेडा असताना तोंडापूर - ढालगांव रस्त्यावर एका ढाब्यावर या पथकाने अचानक छापा मारल्याने याठिकाणी दहा दारुचे खोके जप्त केले आहे. एलसीबीने हि कारवाई शनिवारी रात्री केली असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एकाला अटक करण्यात आली आहे.
हे पथक पाहणी करीत असताना त्यांना शनिवारी रात्री तोंडापूर ढालगांव रस्त्यावरील एका ढाब्यावर दारुविक्री करताना गणेश फुलचंद शिरे रा. ढालसिंगी यास रंगेहाथ पकडून ढाब्यावरून २६ हजार ३६३ किंमतीचे देशी दारू चे दहा खोके जप्त केले आहे.पोलीस कर्मचारी भगवान तुकाराम पाटील यांच्या फिर्यादिवरून ढाब्याचे जागा मालक हर्षल भरत पवार, जामनेर येथील देशी दारू दुकानदार नरेश अण्णा (नाव पूर्ण माहिती नाही) या तिघांविरूध्द पहूर पोलीसात मध्यरात्री गुन्हा दाखल करून गणेश शिरे याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईने परीसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधिक्षकांकडून दोन पोलीस मुख्यालयात जमा
या परीसरात पालकमंत्र्याच्या दौऱ्या निमित्ताने पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतर्क राहण्याच्या सुचना पोलिसांना वरिष्ठांकडून देण्यात आल्या होत्या. यापूर्वीही अवैधंदे बंद ठेवण्याच्या सुचना पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या कडून देण्यात आल्या आहेत. परंतु फरक न जाणवल्यामुळे तोंडापूर बीटचे अशोक हटकर व वाकोद बीटचे हवलदार किरण गायकवाड यांना यासाठी जबाबदार धरून तडकाफडकी पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या आदेशानुसार शनिवारी रात्रीच पोलिस मुख्यालयात जमा केल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
पालकमंत्र्यांच्या आदेशाने कारवाई
पालकमंत्री ना.गिरीश महाजन हे भारुडखेडा येथे शनिवारी गेले होते. या दरम्यान गावातील
उपस्थित महिलांनी गावठी दारू विक्री संदर्भात तक्रार केली. गावठी दारू विक्रेत्यांविरूध्द बीट हवलदार किरण गायकवाड कारवाई करीत नाही, असे गाहाणे मांडले. यावर महाजन यांनी बंदोबस्तला असलेले किरण गायकवाड यांची कान उघडणी केली आहे. व तातडीने पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांना भ्रमनध्वनीवरून सुचना करून कारवाई चे आदेश दिले. त्यावरून डॉ. उगले यांनी कारवाई केली आहे.