खुनाच्या तपासासाठी एलसीबी पथक तळ ठोकून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 11:46 PM2021-06-03T23:46:08+5:302021-06-03T23:47:01+5:30

टाकरखेडा धरणगाव रस्त्यावर वनजमिनीत जळालेल्या अवस्थेत एक प्रेत आढळून आल्यानंतर अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LCB squads set up to investigate murder | खुनाच्या तपासासाठी एलसीबी पथक तळ ठोकून

खुनाच्या तपासासाठी एलसीबी पथक तळ ठोकून

Next
ठळक मुद्देअमळनेर : आधी ओळख पटविण्यासाठी हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क

अमळनेर : शहरात टाकरखेडा धरणगाव रस्त्यावर वनजमिनीत जळालेल्या अवस्थेत एक प्रेत आढळून आल्यानंतर अज्ञात व्यक्तिविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  जळगाव गुन्हे शाखा तथा एलसीबी निरीक्षक  व त्यांच्या पथकाने गुरुवारी अमळनेरात भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. यानंतर हे पथक शहरातच मुक्कामी थांबले आहे.

ही घटना म्हणजे खुनाचाच प्रकार असावा आणि लपविण्याच्या उद्देशानेच त्यास येथे आणून टाकला असावा असा अंदाज एलसीबीचा आहे. त्याआधी हा व्यक्ती नेमका कोण व कुठला यास प्राधान्य देण्यात येत असून त्यानंतर खुनाच्या दिशेने पुढील तपास सुरू होणार आहे. मात्र परिस्थितीजनक पुराव्यानुसार खुनाचा गुन्हा आधीच दाखल झाला असल्याची माहिती निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत हे पथक अमळनेर पोलिस ठाण्यात होते. अजून काही माहिती हाती लागली किंवा नाही त्याबद्दल अधिक समजू शकले नाही.

दरम्यान धरणगाव टाकरखेडे रस्त्यावर वन जमिनीत एक 30 वर्षीय युवकाचे प्रेत जळालेल्या अवस्थेत असल्याची माहिती पळासदळे येथील गणेश आत्माराम पाटील यांनी पोलिसांना दिल्यानन्तर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे , डी वाय एस पी राकेश जाधव , पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,एपीआय राकेश परदेशी , पोलीस उपनिरीक्षक राहुल लबडे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्या युवकाची पॅन्ट व अंडर्वियर अर्धवट अवस्थेत जळलेले होते. 

युवकाला मारहाण करून जाळले?

दरम्यान मयताच्या हातावर ओम चे चिन्ह दिकशआवि असे गोंदलेले होते. त्याच्या छातीवर मारहाण झाल्याचे व पायाचे हाड मोडलेले  दिसून आले. जवळच रक्त लागलेले लाकूड देखील पडलेले होते. तसेच रिकाम्या बाटलीला पेट्रोल चा वास येत होता. त्यामुळे त्या युवकाला आधी मारहाण करून नन्तर जाळण्यात आले असावे ही घटना ३० ते ३१  दरम्यान घडली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रेताची नखे, केस , रक्ताचे नमुने डी एन ए चाचणी साठी फॉरेन्सिक प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे करीत आहेत.

Web Title: LCB squads set up to investigate murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.