लाडू गँगच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 07:52 PM2020-11-21T19:52:24+5:302020-11-21T19:52:36+5:30

राकेश सपकाळे खून प्रकरण : मध्यरात्री एलसीबीने घातली झडप

The leader of the Laddu gang smiled | लाडू गँगच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

लाडू गँगच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या

googlenewsNext

जळगाव : माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राकेश याच्या खून प्रकरणात फरार असलेला लाडू गँगचा प्रमुख आकाश मुरलीधर सपकाळे (२३,रा.कांचन नगर) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री पाळधी, ता.धरणगाव येथून मुसक्या आवळल्या. गुन्हा घडल्यापासून आकाश सपकाळे हा पोलिसांना चकवा देत होता. रोज गँगच्या इतर सहकाऱ्यांकडून माहिती घेऊन तो राहण्याचे ठिकाण बदल करीत होता. शनिवारी सकाळी त्याला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
राकेश याचा ४ नोव्हेंबर रोजी खून झाला होता. त्यात गणेश दंगल सोनवणे (रा. वाल्मिक नगर), विशाल संजय सपकाळे (रा.राजाराम नगर), रुपेश संजय सपकाळे (रा.कांचन नगर) आणि महेश राजू निंबाळकर या चार जणांना अटक करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने चौघांची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान, अधिकच्या चौकशीत आकाश हा देखील गुन्ह्यात निष्पन्न झाला होता. पोलिसांनी त्याला पाचव्या क्रमांकाचा आरोपी केला आहे. त्याच्या अटकेने या गुन्ह्याचे वर्तुळ पूर्ण झाले असले तरी धग मात्र कायम आहे.
आकाश याची गुन्हगारी दहशत तसेच त्याच्या गँगने शहरात माजविला धुमाकूळ पाहता तो पोलिसांना कोणत्याही परिस्थितीत हवा होता. त्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले आदी अधिकारी रोज या गुन्ह्याचा आढावा घेऊन तपासासाठी पोलिसांचे पथके रवाना केली जात होती. अशातच आकाश हा पाळधी येथे रात्री येत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे हवालदार विजयसिंग पाटील यांना मिळाली. बकाले यांनी विजयसिंग यांच्या दिमतीला जितेंद्र पाटील, राहूल पाटील, प्रीतम पाटील, नितीन बाविस्कर व शहरचे रतन गिते आदींचे पथक दिले. या पथकाने ज्या ठिकाणी आकाश येणार त्याच परिसरात आधीच सापळा लावला व त्यात तो अलगद जाळ्यात अडकला.

Web Title: The leader of the Laddu gang smiled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.