समाजाचा आरसा न होता नेतृत्व व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:09 PM2019-09-15T23:09:05+5:302019-09-15T23:09:50+5:30

सहविचार सभा : डॉ.भूषण पटवर्धन यांचे प्रतिपादन

Leadership without a community mirror | समाजाचा आरसा न होता नेतृत्व व्हावे

समाजाचा आरसा न होता नेतृत्व व्हावे

googlenewsNext

जळगाव- समाजात मिळणारे शिक्षण हे वर्गात मिळणाऱ्या शिक्षणापेक्षा अत्यंत प्रभावी असते. तसेच आपण समाजाचा आरसा न होता नेतृत्व व्हावे, असे प्रतिपादन विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ.भूषण पटवर्धन यांनी केले़
केसीई सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त मुळजी जेठा महाविद्यालयातील जुन्या कॉन्फरन्स हॉल येथे सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती़ त्याप्रसंगी ते बोलत होते़
तंत्रस्नेही विद्यार्थ्यांकडून बरंच काही शिकता येण्यासारखे
डॉ़ भूषण पटवर्धन पुढे म्हणाले की, विद्यापीठ अनुदान आयोगाने दहा व्हर्टीकल असलेला प्रोग्राम सुरू केलेला आहे. डॉ. कस्तुरी नंदन यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेल्या त्या समितीने लिबरल एज्युकेशन ही संकल्पना मांडली आहे. विद्यार्थी केंद्रित शिक्षण व्यवस्था आणि गुणवत्ता तसेच सर्वांगीण विकास या बाबी केंद्रस्थानी मांडण्यात आलेल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांसाठी नॅशनल अकॅडमी क्रेडिट बँक स्थापन करण्यात येणार आहे. पदवीला प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांसाठी दीक्षा आरंभ सोहळ्याचे आयोजन संस्थांनी करायला हवे. आजचा विद्यार्थी हा स्मार्ट झाला असून आपल्याला देखील या आजच्या तंत्रस्नेही विद्यार्थ्यांकडून बरंच काही शिकता येण्यासारखे आहे. आपली भारतीय शिक्षण परंपरा ही प्रश्नोत्तरावर आधारलेली आहे. त्यामुळे एक उत्कृष्ट विद्यार्थी घडविण्यासाठी आपल्यामध्ये काळानुरूप बदल घडवला गेला पाहिजे असे विचार त्यांनी यावेळी मांडले .
निर्णयांची दिली माहिती
विद्यापीठ अनुदान आयोगाने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती देताना ते म्हटले की, आता युजीसीतर्फे निर्देशित केलेल्या जर्नल्स मधूनच रिसर्च पेपर प्रकाशित होणे बंधनकारक असेल. नविन रुजू होणार्‍या प्राध्यापकांसाठी एका महिन्याचा फॅकल्टी प्रोग्रामह्वसुरू करण्यात येणार आहे. तो सहा महिन्याच्या आत करणे बंधनकारक असेल. यासाठी चारशे ट्रेनर्स तयार केले गेलेले आहेत. यूजीसी आणि एआयसीटीसी आता नव्या शैक्षणिक धोनांवर एकत्र काम करणार आहेत . ज्या महाविद्यालयांना नॅक ची ए श्रेणी मिळवली असून त्या महाविद्यालयांनी इतर महाविद्यालयांनी टी श्रेणी मिळवण्यासाठीच्या प्रक्रियेच मार्गदर्शन करावे यासाठी युजीसी ने परामर्श हि योजना सुरु केली आहे.





पटवर्धन यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

खान्देशशी माझी जुनी नाळ जुळलेली आहे.पुण्यात इतक्या वषार्पासून जरी राहत असलो तरी जळगावचे भरीत आणि केली यांची चव आजही जिभेवर रुळलेली आहे . खान्देशातील विद्यार्थ्यांना विशेषत: धुळे आणि जळगावच्या विद्यार्थ्यांनी पुणे आणि मुंबईच्या मुलांना आदर्श मानायला नको. कारण इथली संस्कृती व परंपरा या समृद्ध आहेत, त्यामुळे यातूनच त्यांनी नवीन बदल त्यांनी घडवायला हवा





प्रास्ताविक मु.जे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय कुलकर्णी तर मान्यवरांचा परिचय शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक राणे यांनी केला. के.सी.ई.चे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी भूषण पटवर्धन यांचे स्वागत केले . तसेच मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. युवाकुमार रेड्डी यांनी प्रज्ञावंत नंदकुमार जी बेंडाळे यांचे स्वागत केले.

यावेळी प्रज्ञावंत नंदकुमारजी बेंडाळे यांनी संस्थाचालकांचे प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त केले.

त्यानंतर खुली चर्चा झाली त्यामध्ये विविध संस्थाचालक, प्राचार्य तसेच प्राध्यापक यांनी विविध प्रश्नांवर समस्यांवर आपले मत मांडले यावर डॉ. भूषण पटवर्धन यांनी प्रत्येकाच्या शंकांचं योग्य ते निरसन करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी विविध महाविद्यालयांचे संस्थाचालक तसेच प्राचार्य उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार योगेश महाले यांनी केले.

Web Title: Leadership without a community mirror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.