भुसावळ परिसरात 35 हजारांचा मद्यसाठा जप्त

By admin | Published: June 17, 2017 12:06 PM2017-06-17T12:06:53+5:302017-06-17T12:06:53+5:30

नशिराबाद हद्दीतील हॉटेल व ढाब्यावर धाड टाकत सुमारे 35 हजारांचे देशी-विदेशी मद्य जप्त

At least 35 thousand alcoholic beverages were seized in Bhusawal area | भुसावळ परिसरात 35 हजारांचा मद्यसाठा जप्त

भुसावळ परिसरात 35 हजारांचा मद्यसाठा जप्त

Next

ऑनलाईन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 17 -   अवैध मद्यसाठय़ांवर धाडसत्र सुरूच असून नशिराबाद हद्दीतील हॉटेल व ढाब्यावर धाड टाकत सुमारे 35 हजारांचे देशी-विदेशी मद्य जप्त करीत आरोपींना अटक केली़
पहिली कारवाई हॉटेल शालीमारवर करण्यात आली़ मुक्तार अब्दुल शेख बिलाल यास अटक करण्यात आली तर 23 हजार 632 रुपये किंमतीचे मद्य जप्त करण्यात आल़े दुसरी कारवाई समर सिंग ढाब्यावर करण्यात आली़ संदीप वासुदेव मराठे यास अटक करण्यात आली़ आरोपीच्या ताब्यातून 11 हजार 150 रुपयांची देशी-विदेशी दारू जप्त करण्यात आली़
सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली युवराज अहिरे, दिलीप कोळी, प्रदीप पाटील, अयाज, संकेत झांबरे, विशाल सपकाळे, नीलेश बाविस्कर, दीपक जाधव, गजानन देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली़

Web Title: At least 35 thousand alcoholic beverages were seized in Bhusawal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.